शब्द प्रकाशनचा टिपू सुलतान पत्रसारसंग्रह : पाचशे पत्रांचे भाषांतर लवकरच प्रकाशित; आगावू नोंदणी सुरू


 प्रकाशन
मख़दूम समाचार
२३.१०.२०२३

   टिपू सुलतान यांच्या वसाहतवादविरोधी संघर्षाचा इतिहास भारताच्या उभारणीत, जडणघडणीत अतिशय महत्त्वाचा आहे. हा संघर्ष दुर्लक्षित होऊ नये. काळाच्या ओघात, सत्तेच्या दडपशाहीने दडपला जाऊ नये. म्हणून टिपू सुलतान यांच्या पाचशे पत्रांचे भाषांतर प्रकल्प संचालकांनी पाच वर्षांपुर्वी केले. प्रकल्पातील किचकटपणा, निर्मितीप्रक्रिया आणि टाळेबंदीनंतर हा प्रकल्प पुस्तकरुपात प्रकाशित होतोय. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. प्रकल्पाशी निगडीत सर्वच सहकार्‍यांचे त्यांनी आभार मानले. विशेषत: शब्द प्रकाशनचे येशू पाटील, प्राजक्ती बक्षी, प्रकल्पात महत्वाची भुमिका असणारे म्हैसूरचे सय्यद शजीर हसन अशी कितीतरी नावे नोंदवता येतील. सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
    बुकींगच्या रुपात वाचकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकल्प संपादक सय्यद शाह वाएज व सरफराज अहमद यांनी केले आहे. आगावू नोंदणी व अधिक माहितीसाठी 9820147284 या क्रमांकावर संपर्क साधावा.







Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा