मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) ६.१०.२०२३
येथील भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर महाविद्यालयातील सय्यद आयशा इक़बाल यांनी नुकतिच बँकिंग आणि वित्त विषयातील पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या विशेष संदर्भात 'ई-बँकिंग धोरणांचा अभ्यास आणि ग्राहकांचे समाधान' या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. हा प्रबंध त्यांनी महाविद्यालयातील वाणिज्य संशोधन केंद्र येथे अभ्यास करून सादर केला.
या विषयासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांना पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील अजयकुमार मधुकर पालवे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, उपप्राचार्य डॉ.सय्यद रजाक व डॉ. रवींद्र देशमुख यांचे सहकार्य लाभले.
त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षण चाँद सुलताना हायस्कूल येथे झालेले आहे. आता त्या डॉ.आयशा इक़बाल सय्यद या नावाने ओळखल्या जातील. इतिहासप्रेमी मंडळाचे इंजी.अभिजीत एकनाथ वाघ, सय्यद समी, असिफखान दूलेखान, अहमदनगर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे भैरवनाथ वाकळे, किरण डहाळे, पंकज गुंदेचा, अजय शादीजा, दलजितसिंह वधवा, रविंद्र फुलसौंदर तसेच सकल भारतीय समाजाचे संध्या मेढे, प्रा.डॉ. महेबुब सय्यद, युनूसभाई तांबटकर, डॉ. प्रशांत शिंदे आदींना त्यांचे विशेष अभिनंदन केले.
إرسال تعليق