अहमदनगर- संगीत प्रेमी राजू क्षेत्रे प्रस्तुत आय लव यु 90 हिंदी गाण्यांचा कार्यक्रमाचे रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजता सावेडी येथील माऊली सहभागृहात आयोजन करण्यात आले असुन प्रवेश विनामूल्य असल्याचे राजू क्षेत्रे यांनी सांगितले.या कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील श्री स्वामी समर्थ च्या टायटल सॉंग फेम व सारेगामा सेमी फायनालिस्ट आस्था लोहार मुंबई,संगीत विशारद अहमदनगर रेडिओ सिटी गीत गायन स्पर्धा उपविजेता आसावरी पंचमुख हे प्रमुख पाहुणे कलाकार व त्यांच्याबरोबर राजू क्षेत्रे, निलेश महाजन, सुनील भंडारी, संतोष पानसरे, दिनेश मंजरतकर हे गीते सादर करणार असून सुत्रसंचालन जुबेर शेख करतील. ध्वनी व लाईट शांती ऑडिओचे असणार आहे. रसिकांसाठी कार्यक्रमांमध्ये लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम भैय्या जगताप, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्या प्रमिला दिवटे, भाई सथ्था हायस्कुलचे प्राचार्य सुनील सुसरे, सुफी गायक पवन नाईक, उद्योगपती धनेश बोगावत, उद्योगपती बबलूशेठ पतके, शांती ऑडिओचे राजू ढोरे,पत्रकार आबिद दुलेखान, आंतरराष्ट्रीय कवयित्री डॉ.कमर सुरूर, उद्योजक कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब पानसरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ संगीत रसिकांनी आवश्य घ्यावा कार्यक्रम वेळेवर सुरू होईल असे राजू क्षेत्रे यांनी सांगितले आहे.
إرسال تعليق