येथील दैनिक विदर्भ सत्यजीत आणी दैनिक साईसंध्या ( बुलढाणा आवृती) संपादक पत्रकार उद्धव फंगाळ यांची स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
श्रीरामपूर येथील संघटनेच्या मुख्य कार्यालयात स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
यावेळी पत्रकार गजानन बोरकर, सुषेन हेकाडे, अजीजभाई शेख, संघटनेचे महासचिव ॲड. मोहसिन एस.शेख, मोहसिन ए मिल्लत चे नदिमताज रेहानी गुलाम, शब्बीर (राजुभाई) खाटीक आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.फंगाळ यांची नवोदित पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची धडपड पाहता त्यांची दुसऱ्यांदा संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे यावेळी संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी सांगितले.
तर यावेळी श्री.फंगाळ म्हणाले की, संघटनेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणी दिलेली जबाबदारी ही इमाने - ऐतबारे मी पुर्ण करील,संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातील नवोदित पत्रकार,संपादक बंधू - भगीनींसाठी विविध उपक्रमांद्वारे फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करील, तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्हा, तालुका आणी कानाकोपऱ्यात संघटनेचे मोठे विस्तार करण्याचे कार्य लवकरच हाती घेऊन विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ते म्हणाले.
त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार राजेंद्र बनकर, योगेश सौभागे, दिलीप वनवे,सौ.किरण वाघ, गजानन बोरकर, अजिजभाई शेख, डॉ.अशिष तिवारी, हेमकांत गायकवाड, गजानन कुलकर्णी, पांडुरंग गोरे, प्रफुल्ल नान्ने, सचिन संघई, विकास पाटील, सदानंद जाधव, जावेद सय्यद,काळूराम भोईर,अमजदखान,जावीद शेख आदिंनी अभिनंदन केले आहे.
إرسال تعليق