रात्री पिंजरे लावा, मोठे मासे आधी पकडून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करत ठेवीदारांचे पैसे आधी द्या; एमपीआयडी न्यायाधिश शित्रे यांचे पोलिसांना निर्देश !



अहमदनगर (प्रतिनिधी) ६.२.२०२४
    राज्यासह देशात प्रसिध्द असलेल्या नगर अर्बन बँकेच्या २९१,२५,६१,०००/- रूपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या अटकेत असलेला बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, भाजपाचा माजी मनपा स्थायी समिती सभापती मनेष साठे आणि सरकारी कंत्राटदार अनिल कोठरी याला आज न्यायालयाने पोलिस कोठडी दिली.
     आर्थिक गुन्हे शाखेने टाकळी ढोकेश्वर येथील अशोक कटारिया, मनेष साठे, अनिल कोठारी यांना अटक केल्यावर न्यायालयाने त्याला ५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यांना आज न्यायालयात पुन्हा हजर केले. यावेळी पोलिसांनी तपासाची माहिती दिली. मुख्य तपासी अधिकारी गैरहजर असल्याने वाचक यांनी माहिती दिली.
     सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने ॲड. महेश तवले, ॲड. संजय दुशिंग,आणि संजय वालेकर यांनी बाजू मांडली.
   किती आरोपी पकडले?, जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलेल्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली का? नसेल लावली तर तुम्ही काय कारवाई केली? तुम्ही काय एक्शन घेतली पोलिसांना न्यायालयाने असे  सवाल केले. प्रॉपर्टी जप्त केली का? तुमच्याकडे सल्ला देणारे कोणी आहे का नाही?


     ठेवीदारांच्या वतीने ॲड. अच्युतराव पिंगळे यांनी बाजू मांडली. आरोपी रात्री घरी येत असल्याचे त्यांनी सांगितल्यावर रात्री पिंजरे लावा, मोठा मासा पकडा त्याची प्रॉपर्टी जप्त करा. गुन्ह्यातील १०५ लोकांच्या प्रॉपर्टी जप्त करा. सातबारे काढा त्यासाठी तहसीलदारांची मदत घ्या. ठेवीदारांचे पैसे त्यांना आधी दिले पाहिजेत. असेही कोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेला सुनावले.
   मर्दाबाबत न्यायालयाने विचारणा केली असता, पोलिसांनी सांगितले आरोपीचा पासपोर्ट जप्त केला आहे. बाकी कारवाई सुरू आहे. मात्र आज तपासी अधिकारी आले नाहीत डिवायएसपी खेडकर प्रभारी अधिकारी होते, मात्र त्यांच्या जागी बदली होऊन दुसरे अधिकारी आल्याने खेडकर न्यायालयात आले नव्हते.
     शहरातील शहर सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी जमिनीवर असलेला चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा हा न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नाही, पोलिस स्टेशनला येत नाही, त्याच्यावर पोलीस अटकेची कारवाई का करत नाही? अशी बाजू न्यायालयात ठेवीदारांच्या वतीने मांडण्यात आली.
    ठेवीदारांचे पैसे आधी दिले पाहिजेत असे एमपीआयडी न्यायाधिश प्रशांत शित्रे यांनी सांगितले.

BolBhasha Travellers Enquiry साठी संपर्क करावा









Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा