شیو جینتی کے جلوس کا شہر میں مسلمانوں نے خیر مقدم کیا मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

 مراٹھی پریس کانفرنس، حاجی عزیز بھائی سوشل فاؤنڈیشن اور مسلم سوسائٹی کی سرگرمیاں

 جلوس میں شامل طلباء میں ریفریشمنٹ کی تقسیم

 احمد نگر (عابد خان) چھترپتی شیواجی مہاراج کے یوم پیدائش کے موقع پر مراٹھا ودیا پرسارک سماج سنستھا کی جانب سے شہر سے نکالے گئے جلوس کا کپڑا بازار میں مراٹھی پریس کانفرنس کے ذریعے استقبال کیا گیا، حاجی عزیز بھائی چشمہ والا سوشل فاؤنڈیشن اور مراٹھا ودیا پرسارک سماج سنستھا۔ مسلم کمیونٹی کی جانب سے جلوس میں شریک طلباء میں پانی، جوس، کولڈ ڈرنکس اور ریفریشمنٹ تقسیم کی گئی۔
 اس پہل کی شروعات مراٹھی پریس کانفرنس کے ریاستی جنرل سکریٹری منصور شیخ نے کی۔  اس موقع پر کونسل کے ریاستی پبلسٹی ہیڈ سندیپ کلکرنی، ڈیجیٹل میڈیا کونسل کے ضلع صدر آفتاب شیخ، عظمت ایرانی، نوید شیخ، جنید شیخ، عدنان شیخ، یوگیش بیدرے، رمیز شیخ، سمیر شیخ، فیاض شیخ، منتظیم پٹھان وغیرہ موجود تھے۔ رفیق رنگریز، محسن باوا، مجاہد پٹھان، حسین رنگریز، شاکر شیخ، مونو نثار شیخ وغیرہ کے علاوہ مسلم کمیونٹی کے نوجوان کثیر تعداد میں موجود تھے۔
 منصور شیخ نے کہا کہ چھترپتی شیواجی مہاراج عوام کے سیکولر بادشاہ تھے۔  انہوں نے کبھی ذات پات، مسلک، مذہب کی تفریق کو نہیں سمجھا۔  انھوں نے اٹھراپگڑھ ذات کے ساتھ مل کر سوراجیہ قائم کیا۔  اس میں مسلمان ماولوں کا بھی حصہ تھا۔  انہوں نے بہت سے اہم عہدے مسلمان سرداروں کو بڑے اعتماد کے ساتھ سونپے۔  انہوں نے کہا کہ اگر ہر کوئی چھترپتی شیواجی مہاراج کے خیالات کو اپنا لے تو سماج میں کبھی بھی دراڑ نہیں آئے گی، لیکن ہر ایک کو شیواجی مہاراج کے نظریات کو اپنانے کی ضرورت ہے۔
 ہر سال مسلم کمیونٹی کے نوجوان پہل کرتے ہیں اور کپڑا بازار میں شیو جینتی جلوس کا بڑے جوش و خروش سے استقبال کرتے ہیں۔  شیواجی مہاراج نے تمام مذاہب کی برابری کا درس دیا ہے. جس کے مطابق مسلم کمیونٹی کے نوجوانوں کی طرف سے اٹھایا گیا یہ اقدام قابل تعریف ہے، اس موقع پر موجود اساتذہ نے اپنے جذبات کا اظہار کیا۔

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केल शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मुस्लिम समाजाचा उपक्रम

मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप

अहमदनगर (आबीद खान) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी, ज्युस, कोल्ड्रिंक व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे प्रारंभ मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, डिजीटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, अजमत इराणी,नविद शेख, जुनेद शेख, अदनान शेख, योगेश बिद्रे, रमीज शेख, समीर शेख, फय्याज शेख, मुनत्झीम पठाण, रफिक रंगरेज, मोहसीन बावा, मुजाहिद पठाण, हुसेन रंगरेज, शाकिर शेख, मोनू निसार शेख आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मन्सूर शेख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये मुस्लिम मावळ्यांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम सरदारांकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचा विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरवर्षी मुस्लिम समाजातील युवक पुढाकार घेऊन कापड बाजारात मोठ्या उत्साहात शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत करतात. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली असून, यानुसार मुस्लिम समाजातील युवकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा