अहमदनगर - आपल्या अहमदनगर शहराच्या स्थापना दिवशी 28 मे मंगळवार या दिवशी जॉगिंग पार्क प्रोफेसर कॉलनी चौक येथे संध्याकाळी ठीक सहा वाजता *नगरजल्लोष* हा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे.
यामध्ये भरगच्च मनोरंजनाची मेजवानी असून स्टॅन्ड अप कॉमेडियन, स्टोरी टेलर, अनेक सिने कलाकार व इंडियन आयडॉल गायक गायिका व नृत्य अविष्कार सादर केले जाणार आहेत.सदर कार्यक्रमाला सिने कलाकार प्राजक्ता गायकवाड, श्रेयस तळपदे, स्टोरी टेलर सौरभ भोसले, सिने अभिनेत्री अनिता दाते सांची भोईर, स्वानंद बर्वे, इंद्रनील कामत, रसिका बखारकर,तसेच इंडियन आयडॉल व सा रे ग म गायक लिटल चॅंप श्वेता दांडेकर,जगदीश चव्हाण,गौरी पगारे, जयेश खरे ,भाग्यश्री टिकले ,चैतन्य देवढे,अशी कलाकारांची उपस्थिती व कलेचं सादरीकरण होणार आहे.
*नगर जल्लोष 2024* या कार्यक्रमाला
*मुख्य प्रायोजक-शिंगवी ज्वेलर्स प्रा. लि.*
*सह प्रायोजक - निर्मल डेअरी, महानगरपालिका आणि गाल्को ॲल्युमिनियम*
*श्री बडीसाजन ओसवाल युवक संघ*यांनी सहकार्य केले आहे.
*नगर शहराची सांस्कृतिक ओळख*
*सन्मान सोहळा*
*नगरभूषण पुरस्कार 2024*
आपल्या जिल्ह्याचे भूषण पद्मश्री पोपटराव पवार यांना जाहीर करण्यात आला आहे, तसेच
*कोहिनूर बिजनेस आयकॉन पुरस्कार 2024*
हा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील एक मात्र ई-जोश या इलेक्ट्रिक दुचाकीचे निर्माते तसेच आकाश प्रिसिजन कंपोनंट कंपनीचे संचालक श्रीकृष्ण जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे, व कुमारी रेणुका निसळ हिला ज्ञानसंस्कार पुरस्कर जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे,नगर जल्लोष या कार्यक्रमाला सर्व नगरवासीयांनी उपस्थित राहून आपला स्थापना दिवस माहीत असलेल्या या एकमात्र शहराचा वाढदिवस पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मरणाने जल्लोषात साजरा करावा. या साठी सर्व नगरवासीयांनी आवर्जून उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सागर बोगा संयोजन समितीचे प्रमुख गुंजन शिंगवी व प्रमुख सल्लागार सुहासभाई मुळे यांनी केले आहे.
Post a Comment