संजय निर्मळ सेवापुर्ती निमित्त सर्व सहकारी,हितचिंतक व नातेवाईक उपस्थित राहणे हे काम करणाऱ्या माणसांचे मनोधैर्य वाढवणारे आहे,* असे मत प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी यांनी व्यक्त केले.

संजय निर्मळ सेवानिवृत्त 

अहमदनगर (प्रतिनिधी): *सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत नोकरी करणे आणि यशस्वीपणे सेवानिवृत्त होणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून सेवापुर्ती निमित्त सर्व सहकारी,हितचिंतक व नातेवाईक उपस्थित राहणे हे काम करणाऱ्या माणसांचे मनोधैर्य वाढवणारे आहे,*  असे मत प्रा.डॉ.राधाकृष्ण जोशी यांनी व्यक्त केले.
     शासकीय दूध योजना अहमदनगर येथील अभियंता संजय निर्मळ  यांच्या सेवापूर्ती समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय दूध योजना नगरचे माजी महाव्यवस्थापक सुहास सावंत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष मनोहर पोकळे, केशरबाई निर्मळ, वृषाली निर्मळ, ऍड मुकुल गंधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जोशी पुढे बोलताना म्हणाले की,सर्वसामान्य माणसांसाठी सातत्याने धावून येणारे संजय निर्मळ सेवानिवृत्त होत असताना सामाजिक ध्येय पुढे ठेवून काम करतील.
   शासकीय दूध योजनेमध्ये शीतकरणाचे काम अतिशय चोखपणे बजावणारे संजय निर्मळ निवृत्त होत असल्याने या योजनेतील शेवटची कडी आता निवृत्त होत असून ही योजना शेवटच्या घटका मोजत आहे, ते वाचवायला हवे असे सुहास सावंत म्हणाले. 
   मनोहर पोकळे बोलताना म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटुंबीयांसाठी वेळ देणे आवश्यक असून मित्रपरिवार संस्था, संघटनांमध्ये सामाजिक कार्यासाठी आपला वेळ आता संजय निर्मळ यांनी द्यायला हवा. शब्दगंध चे संस्थापक सचिव बोलताना म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येत असते सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये व्यथित केल्यास निश्चितच प्रेरणादायी आयुष्य आपण जगू शकतो. यावेळी  उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव कुणाल तनपुरे, ऍड मुकुल गंधे सुधाकर रामदिन, प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे,संभाजी मगर,सौ. योगिता मुळे, निलेश निर्मळ, वृषाली निर्मळ यांनी यांनी मनोगत व्यक्त केले तर यावेळी खरे साहेब, दत्ता माळवे, जाकीर अहमद, सादिक मास्टर, देशमुख साहेब, कुणाल तनपुरे, निलेश निर्मळ, दिनेश पुरनाळे, नितीन पुडाळे, विजय आरणे, दत्ता बनकर, विजय लोंढे,विजय जमदाडे, संदीप जमदाडे, नवनाथ कोरे, योगिता निर्मळ, अनिल निर्मळ, शुभम निर्मळ, अभिषेक निर्मळ, राहुल गुंड, अमीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय निर्मळ म्हणाले की, कनिष्ठ अभियंता म्हणून शासकीय दूध योजनांमध्ये मी नोकरीला सुरुवात केलेली असून शक्य होईल तेवढी समाजसेवा सेवा करताना केलेली आहे. अहमदनगर, कुर्ला, मुंबई, अमरावती,नांदुरा,बुलढाणा, परभणी, भूम,उदगीर व अहमदनगर या ठिकाणी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे.सर्वांच्या सहकार्यामुळेच ही सेवा करता आली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम निर्मळ यांनी केले तर मनोगत व्यक्त करून सुनील गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी संजय निर्मळ यांनी आभार मानले. 
सुजलग्राम सारख्या निसर्गाच्या स्थानिध्यात सेवापूर्ती समारंभ आयोजित करून उपस्थित सर्व निमंत्रितांना सुखद धक्का देण्याचं काम संजय निर्मळ यांनी केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस मनोहर पोकळे यांनी शुभेच्छा दिल्या. 
यावेळी सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा