श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील भि.रा. खटोड कन्या विद्यालय ( बालिका हायस्कूल) ची बारावीची विद्यार्थिनी कुमारी नौशिन हाजी अनिस शाह हिने कला शाखेत 88.50 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.विशेष म्हणजे नौशिनच्या घरात मातृभाषा उर्दू असून ही तिने मराठी माध्यमातून हे यश संपादन केले आहे.
कुमारी नौशिन ही शाह बिरादरीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,मुस्लिम पंचायतचे सदस्य हारुण हाजी मासूम शाह यांची नात तसेच फर्निचरचे प्रथित यश व्यापारी युनुस शाह यांची पुतणी तर हाजी अनिस हारून शाह यांची मुलगी आहे.
कुमारी नौशीन हिला प्राचार्या विद्या कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे प्रमुख प्रा. सतिश म्हसे,प्रा. विनायक कुलकर्णी,प्रा. संदीप निकम, प्रा. आदिनाथ जोशी, प्रा.सुप्रिया देशमुख,प्रा. सुरेखा पवार,प्रा.मनिषा औटी,प्रा.सुनिता दाणी यांचे तसेच वडील अनिस शाह व आई नसिम बानो यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील विद्यार्थ्यांनीने मिळविलेले हे यश महाविद्यालयाला अभिमान वाटावा असे असल्याचे प्रतिपादन शाळेचे चेअरमन दत्तात्रय साबळे यांनी केले.
तालुक्यात व शाळेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, सहसचिव रणजित श्रीगोड,कनिष्ठ महाविद्याच्या चेअरमन डॉ.ज्योत्स्रा तांबे,वैशाली जोशी,विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुलकर्णी, स्कूल कमिटी सदस्य सर्वश्री डॉ. गोरख बारहाते,दत्तात्रय काशीद,अरुण धर्माधिकारी,अशोक गाडेकर,अनिल पांडे, बबनराव मुठे,सुरेश बाठीया,मोहनसिंग कथुरिया, उपमुख्याध्यापक विठ्ठल ढगे,पर्यवेक्षिका अनिता शिंदे,कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे प्रमुख प्रा. सतिश म्हसे, प्रा. विनायक कलकर्णी. प्रा. संदीप निकम,
प्रा. सुप्रिया देशमुख, प्रा. सुरेखा पवार, प्रा. मनिषा औटी, प्रा. सुनिता दाणी व लिपिक पंजाबराव भोसले,अनिस शहा, सौ. शहा, सौ. लोंढे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक सतीश म्हसे यांनी केले.
कुमारी नौशिन हिने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल तिचे तालुक्याचे आमदार लहुजी कानडे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,संजय फंड,अनिल कांबळे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख,मुक्तार शाह,मानवता संदेश फाऊंडेशनचे संयोजक सलीमखान पठाण, नजीरभाई शेख,मुशायरा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख,सय्यद बाबा उर्फ कमिटीचे अध्यक्ष मुन्नाभाई पठाण, रज्जाक पठाण,रियाज पठाण,असलमभाई सय्यद,तजम्मुल अन्सारी,नगरसेवक संजय छल्लारे,अशोक उपाध्ये, आयाज तांबोळी,मिल्लत फाउंडेशनचे सचिव सय्यद जाकीर सर,शरीफ मेमन,एडवोकेट शफी अहमद,महबूब शाह,जाफर शाह,
रमजान शाह,साजिद मिर्झा,सोहेल दारूवाला,सलाउद्दीन शेख,याकुब शाह आदींसह विविध थरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment