जुनी गाणी-संगीत मन व बुद्धीला शांती व समाधान देतात- डॉ.दमण काशीद

जावेद मास्टर ग्रुपतर्फे बीनाका गीतमाला संगीत महेफिल संपन्न

अहमदनगर - तंत्रज्ञानाच्या या युगात वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाचे जीवन दिवसेंदिवस धकाधकीचे होत चालले आहे. करमणुकीची माध्यमही दिवसेंदिवस पाश्‍चत्य संस्कृतीकडे वळत असून, मनुष्याचा मानसिक ताण वाढत चालला आहे. अशावेळी जुनी गाणी, संगीतामुळे मन व बुद्धीला शांती, समाधान मिळते. त्या काळातील प्रत्येक पिढी आजही अशा गाण्यांना पसंती देत आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळवून मन प्रसन्न करुन जाते. जावेद मास्टर यांनी अशा जुन्या काळातील गीतांची मैफील जमवून प्रत्येकाला आपआपल्या भारावलेल्या भुतकाळात घेऊन जाण्याचे काम केले आहे. हा अनमोल ठेवा जिवंत ठेवण्याचे काम जावेद मास्टर आर एस. ग्रुपच्या माध्यमातून करत आहे व नवीन हौशी गायकांना व्यासपीठ मिळवुन देत आहे, असे प्रतिपादन संगीतप्रेमी डॉ दमण काशीद यांनी केले.
जावेद मास्टर प्रस्तुत आर.एस. ग्रुपच्यावतीने "बीनाका गीतमाला नग्मे नये पुराने" या जुन्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी डॉ दमण काशीद, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे, सुफी गायक पवन नाईक, रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, प्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट दिनेश मंजरतकर आदि उपस्थित होते.
यावेळी युनुस तांबटकर म्हणाले, आज प्रत्येकजण आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त आहे, या व्यस्त शेड्युलमधून आपला आवडता छंद जोपासण्यासाठी करोओके ग्रुपच्या माध्यमातून जुन्या गितांच्या मैफिलचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे मनाला एक विरंगुळा व ताण-तणावातून थोडेसे रिलिफ मिळते. 
यावेळी रोनित सुखधन, डॉ.सुद्रिक, सुजित सहानी, श्याम व्यासनव, किरण खोडे, राजेंद्र शहाणे,एम डी रफी, सुरेश पवार, निलेश गाडेकर, सुनीता धर्माधिकारी, मुख्तार शेख, मनीषा मॅडम, डॉ. दमण काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, प्रशांत छजलानी, ओसामा शेख, सुनील दादा भंडारी, विद्या तंन्वर, प्रशांत गवते, अन्वर शेख, सुशील देठे, जावेद मास्टर व कुमारी श्रवंती आदींनी मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, लता मंगेशकर, यशुदास, आशा भोसले, कुमार सानु आदी प्रसिद्ध गायकांची सदाबहार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुपचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन आबीद खान यांनी केले. आभार विध्या तंन्वर यांनी मानले. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा