विशालगड घटनेच्या दोषींवर कारवाई करुन, पिडीतांचे पुनर्वसन करण्याची एमआयएमची मागणी

अहमदनगर-कोल्हापूर जिल्ह्यात विशाल गढ येथे काही वर्षापासून अतिक्रमण हटवण्यासाठी काही संघटन आंदोलन करत आहे. संबंधित गडाला  लागत मलीक रेहान दर्गा  हि खूप जुनी असून त्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारकिर्दीत मिळत असल्याचे पुरावे आहे. या दर्ग्याला सर्व धर्माचे लोक मानत असून सर्व धर्माचे भाविक येथे नवस करून फेडण्या साठी येत असतात. विशाल गडा जवळ परिसरात अनेक वर्षापासून नागरीक राहत आहे. काहींनी अतिक्रमण केले असले तरी काहींचे स्वताचे घर आहे. काही दिवसापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करण्या साठी काही संघटना अग्रेसर असल्याने व संबंधित संघटन आंदोलन करीत असल्याने पालिकेने अतिक्रमण हटवण्याचे निर्णय घेतले असल्याचे समजते.
परंतु अतिक्रम काढण्याचे नावाखाली काही जातीवादी आतंकी संघटनेने जातीय दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसत आहे.या संघटनेने अतिक्रमणच्या नावाखाली गजापूर गावात व इतर परिसरात मुस्लीम समाज,त्यांचे धार्मिक स्थळ , धार्मिक ग्रंथाची विटंबना केली आहे. आणि याचे चित्रीकरण व्हायरल केले.संबंधित संघटनने ज्याप्रकारे मुस्लीम समाजाला, मस्जिद ला,धार्मिक ग्रंथाची विटंबना केली. त्यावरून हे स्पष्ट आहे की या जातीवादी आतंकी संघटनेला सरकारचे पाठबळ असल्याचे दिसते. तसेच हे सर्व आतंक घडत असतांना तेथील पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांची जी बघ्याची भूमिका घेतली त्यावरून हे स्पष्ट दिसत आहे.  त्यामुळे या अधिकारींनी
मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहे हे दिसत होते पण यांनी कोणतीच भूमिका त्यावेळी घेतली नाही. या उलट अतिरेक करणाऱ्या आतंकी संघटने सोबत दिसत आहे. याची चौकशी निष्पक्ष होणे गरजेचे आहे. 
हे सर्व घटनाक्रम पाहिले तर असे दिसते की मुस्लीम समाजावर अत्याचार करणे त्यांचे धार्मिक स्थळांची विटंबना करणे, त्यांचे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणे, मुस्लीम समाजाचे महिला, लहान मुले यांना बेदम मारून अत्याचार करणे हे सर्व प्रकरण सरकार, जिल्हा व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने या
आतंकवादी संघटनेने केले असल्याचे आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले.
मुख्यमंत्रीना  देण्यात आलेले निवेदनात डॉ परवेज अशरफी यांनी आरोप केले आहे की विशालगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या नावाखाली या जातीवादी आतंकी संघटनेने जमाव जमा करण्यासाठी आव्हान केले होते.
ज्या प्रकारे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. त्याच प्रकारे कोल्हापूर येथे रजा जामा मस्जीद शहीद करून बाबरी मस्जिद ची पुर्नावृत्ती करण्याचा षडयंत्र या जातीवादी आतंकी संघटनेचे असल्याचे दिसत आहे. तरी दोशींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी एम आय एम ने केली आहे. तसेच ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांचे घर उध्वस्त झाले त्यांचा सरकारने पुनर्वसन करून त्यांना आधार देण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा