माजी नगरसेवक शेख मुदस्सर, जमीर भाई फ्रेंड सर्कल व युथ कराटे फेडरेशनच्या वतीने चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम व युवा जनजागृती कार्यक्रम संपन्न

गांधी जयंतीनिमित्त चांदबिबी महाल येथे स्वच्छता मोहीम व युवा जनजागृती 

अहमदनगर- महात्मा गांधी यांच्या जयंतीचे  औचित्य साधून माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक, जमीर भाई फ्रेंड सर्कल आणि युथ कराटे फेडरेशनच्या वतीने अहमदनगरच्या चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम व युवा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
स्वच्छता मोहिमेअंतर्गत चांदबिबी महाल परिसराची स्वच्छता करण्यात आली. सहभागी युवकांनी परिसरातील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमाचा उद्देश समाजात स्वच्छता, शिस्त आणि गांधीजींच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे हा होता.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जमीर भाई फ्रेंड सर्कलचे सदस्य शाहरुख खान, मुनाफ सय्यद, प्रशिक्षक सबील सय्यद, सहील सय्यद आणि युथ कराटे अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जमीर भाई शेख यांची चिमुकली मुलगी मदिहा शेख हिने "हदिस तंजफु फइनल इस्लामा नजीफून" या हदीसचे पठण केले, ज्याचा अर्थ "स्वच्छ रहा कारण इस्लाम हा स्वच्छ धर्म आहे." या पठणाद्वारे तिने इस्लाम धर्मात स्वच्छतेला किती प्राधान्य आहे, हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात झाले आणि युवकांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा