नगर - जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून आयुष रूग्णालय येथे ऋतुजा फाऊंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर, हिमोफिलिया डे केअर सेंटर जिल्हा रूग्णालय, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन, सक्षम संस्था अहिल्यानगर आयोजित थैलेसेमिया रूग्णांसाठी आणि जनजागृती साठी विविध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरामध्ये थॅलेसेमिया रूग्णांची वार्षिक तपासणी एच. एल. ए. टायपिंग बोन मॅरो रजिस्ट्रेशन,रक्तदान, अवयवदान, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच थॅलेसेमिया रूग्णांच्या नातेवाईकांची थैलेसिमिया मायनरची
इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. एकूण २०० मायनरची तपासणी ह्या शिबीरात करण्यात आली. प्रास्ताविकात अॅड. डॉ. अंजली केवळ यांनी विविध शिबीरांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश अहिल्यानगर चंद्रकांत बागल, यांनी ऋतुजा फाऊंडेशन आणि इतर सर्व संस्था एकत्र येऊन जिल्हा
रूग्णालयाच्या मदतीने करत असलेल्या कामाचे कौतुक करुन असेच स्तुत्य कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत असे नमूद केले. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर श्रीमती भाग्यश्री का.पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गरजू थैलेसेमिया व
सर्वच रूग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील सेतू व्हावे.तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमा बद्दल आणि अनेक योजनांबद्दल माहिती दिली. कोणत्याही समस्येत न्यायालय सदैव रूग्णांच्या पाठीशी
आहे.थॅलेसेमिया रूग्णांना दिव्यांगांचे कार्ड आता कायमस्वरूपी मिळणार आहे हे सांगितले. श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कायदया विषयी माहिती देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनचे नरेंद्रकुमारजी फिरोदिया म्हणाले जे जे पेशंट ह्या आजारानी ग्रस्त आहेत त्यांना धीर
देण्याचे तसेच योग्य मार्गदर्शन देण्याचे आणि थॅलेसेमिया जनजागृतीचे काम ऋतुजा फाऊंडेशन उत्तम रीतीने करत असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नानासाहेब तथा सुरेश अण्णाजी जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिव्यांगांसाठी काम करते आणि थैलेसेमिया मुक्त भारत करायचे स्वप्न असल्याचे नमूद केले. डॉ. नागोराव एस. चव्हाण (जिल्हा
शल्य चिकीत्सक जिल्हा रूग्णालय अहिल्यानगर) यांनी थॅलेसेमियामुक्त भारत होण्यासाठी प्रत्येकाने लग्ना अगोदर थॅलेसेमियाची तपासणी केली पाहिजे असे सांगितले. डाॅ. साहेबराव डवरे (अति. जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रूग्णालय) श्रीधर वापट(पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष, सक्षम संस्था, अहिल्यानगर) यांनी सक्षम ची माहिती उपस्थितांना दिली. तसेच नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय अधिवेशन असल्याने सर्व दिव्यांगांनी उपस्थित राहण्यास सांगितले. यावेळी अशोकजी जव्हेरी ( प्रांत कार्यालय प्रमुख, सक्षम संस्था पुणे) डॉ.राजीव चिटगोपीकर (अध्यक्ष, सक्षम संस्था अहिल्यानगर)
डॉ. मनोज घुगे (व्यवस्थापकीय अधिकारी जिल्हा रूग्णालय) महेश केवळ (संस्थापक ऋतुजा फाऊंडेशन) डॉ.आशिष इरमल (जिल्हा समन्वयक जिल्हा रूग्णालय) सुनिल जगदाळे (कोषाध्यक्ष सक्षम संस्था अहिल्यानगर) कु. ऋतुजा केवळ (उपाध्यक्षा ऋतुजा फाऊंडेशन) श्रीमती रेखा चुत्तर (खजिनदार ऋतुजा फाऊंडेशन) श्रीमती छाया जाधव (अधिसेविका जिल्हा रूग्णालय) महेश जोगदंड (भौतिकोपचार तज्ज्ञ जिल्हा रूग्णालय) अविनाश कराळे (समुपदेशक जिल्हा रूग्णालय) आदी शिबीरास उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर, हिमॅटॉलॉजि डे केअर सेंटर, जिल्हा रूग्णालय अहिल्यानगर, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल
फाऊंडेशन अहिल्यानगर, सक्षम संस्था अहिल्यानगर तसेच डाॅ.स्वाती कराड, डाॅ.विलास मढीकर, सुनिल महानोर, रामदास शेवाळे, सुर्यकांत केवळ, मंगेश केवळ, महेश राहींज, ऋषीकेश केवळ, अशोक तोरडमल आणि सर्व थैयॅलेसेमिया योद्धे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्रीमती वर्षा रोडे पाठक यांनी सूत्रसंचालन केले. आणि ऋतुजा केवळ यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment