डॉ. जैनब पटेल एम.एस. (सर्जरी) परीक्षेत महाविद्यालयात प्रथम

नगर ः येथील डॉ. जैनब पटेल यांनी नुकत्याच झालेल्या एम.बी.बी.एस. नंतर एम.एस. (सर्जरी) या पदव्युत्तर परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सर्जरी क्षेत्रात महिला डॉक्टरांचे प्रमाण तुलनेत कमी असताना, डॉ. पटेल यांनी दाखवलेली मेहनत, चिकाटी आणि शिस्त यामुळे त्या नगर जिल्ह्यातील दुर्मिळ महिला सर्जन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
पुण्यातील MIMER (एमआयएमईआर) महाविद्यालयामधून त्यांनी एम.बी.बी.एस. व आय.आय.एम.एस.आर. महाविद्यालयामधून एम.एस. परीक्षा उत्तम गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी उभारलेला हा मैलाचा दगड अनेक तरुणींना निश्‍चितच प्रेरणा देणारा ठरेल.
डॉ. जैनब पटेल या येथील त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. एम.के.शेख यांच्या कन्या असून, मधुमेह तज्ज्ञ डॉ. अश्पाक पटेल यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल समाजामधून व डॉक्टरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा