आंतरराष्ट्रीय "थेअरी ऑफ म्युझिक" संगीत परिक्षेत ग्रेस म्युझिक अॅकॅडमीचे घवघवीत यश

अहमदनगर - लंडन येथील ट्रीनिटी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या थेअरी ऑफ म्युझिक ग्रेड 1 संगीत प्ररिक्षेत नगरमधील ग्रेस म्युझिक अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. 
या परिक्षेत अभिषेक पोळ (98/100), ईशा बड्‌वे (97/100), अँरन पंडीत (96/100) अँजेलो थोरात (96/100), ओंकार राऊत (96/100),ओजस राऊत (94/100), शलमोन पहिलवान (87/100) आशिता लोखंडे (84/100) यांनी या परिक्षेत गुणवत्तापूर्वक यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी पिटर पंडीत सर म्हणाले, संगीता‌ला भाषा, देश,प्रांत नसतो.एक अविट आनंद देणारे संगीत सर्वांनाच भावत असते. संगीत साधनेतून निर्माण होणाऱ्या या कलेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद असेच आहे. परिक्षेतील सहभागामुळे देश-विदेशातील संगीताचे ज्ञान वाढण्यास मदत झाली. त्यात मिळविलेल्या यशामुळे विद्यार्थ्यां मधील आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले.व या परिक्षेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहीती साठी ग्रेस म्युझिक ॲकॅडमी डॉन बॉस्को कॉलनी, काॅटेज कॉर्नर जवळ, सावेडी, अहिल्या नगर येथे किंवा 9511224794/ 9890978997 या क्रमांकावर संपर्क करावे. असे आवाहन पिटर सर व सोनाली मॅडम यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा