आर.एस.पी.शिक्षक अधिकारी संदीप गोसावी यांचे यश

देवळाली प्रवरा ता.राहुरी (प्रतिनिधी) : “महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलीस व शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संघटन नागपूर यांचे संयुक्त  विद्यमाने दि.२१ मे ते ३० मे २०२५ अखेर आर एसपी  शिक्षक अधिकारी प्रशिक्षण पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे पर पडले.या प्रशिक्षणासाठी एकूण ९० शिक्षक अधिकारी हजर होते.
     या प्रशिक्षणासाठी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळच्या केशव गोविंद विद्यालयाचे  उपक्रमशील शिक्षक संदीप गोसावी यांची निवड झाली होती.सदर प्रशिक्षणामध्ये ड्रिल, वाहतूक नियंत्रण, नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा, प्रथमोपचार,  आकस्मिक सेवा तसेच शिस्त यांचा समावेश होता.या सर्व विषयांची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली. आपत्कालीन परिस्थीतीत कसा बचव करता येईल ? हानी कशी टाळता येईल? याचे  प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शेवटी सर्व प्रत्यकक्षिकावर आधारित लेखी परीक्षा झाली. शेवटच्या दिवशी पासिंग आऊट परेडनें मान्यवरांना सलामी देण्यात आली.यामध्ये प्रशिक्षण यशस्वीपूर्ण केल्याबद्दल संदीप गोसावी यांचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, RSP संघटनेचे अध्यक्ष संजय शेंडे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित. आर. एस.पी.चे नाशिक विभागाचे समादेशक सिकंदर शेख यांचे हस्ते प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
   सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा समादेशक सोमनाथ बोतले, उपजिल्हा समादेशक प्रकाश मींड,नगर तालुका RSP समादेशक राजीव धस यांनी विशेष परिश्रम घेतले.ड्रिल इन्स्ट्रकटर म्हणून मुसा सय्यद यांनी आपली जबाबदारी पार पाडली.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील पहिले RSP अधिकारी होण्याचा मान संदीप गोसावी यांना मिळाला.त्यांच्या या यशाबद्दल संचालक मंडळ, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती राणी साळवे,पर्यवेक्षक श्रीनिवास खर्डे,शिक्षक प्रतिनिधी उदय गायकवाड  पोलीस निरीक्षक अनिल भारती,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,समाज संघटनेचे डॉ.कृष्णदेव गिरी, धनंजय गिरी, उर्मिला भारती, बबनराव गिरी,श्रीधर गिरी यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा