अहमदनगर - समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे दिनांक 3 जून रोजी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होत असून त्याकडे पुरातत्व विभाग अहमदनगर चा हेतू पुरस्सर दुर्लक्ष आहे, अहमदनगर चे संस्थापक यांची मजारला जाण्यासाठीच रस्ता नाही व इतर वास्तु उध्वस्त होण्याची पुरातत्व विभाग वाट पाहत आहे. समाजवादी पार्टी अहमदनगर तर्फे सदर विषयी कारवाई झाली नाही तर 12 जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु गेंड्याची कातळीचे निर्लज्ज व कामचुकार अधिकारी व कर्मचऱ्यांनी आमच्या आंदोलनास पूर्ण डोळे झाक केली. त्यांचं मुस्लिम द्वेष पूर्णतः बाहेर आले. समाजवादी पार्टी अहमदनगर या विषयी पूर्ण पाठ पुरावा करून पुरातत्व विभागाशी पूर्ण संघर्ष करून वरील ऐतिहासिक वास्तूंना पुन्हा सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करणार.आज ठिय्या आंदोलन करण्यात आले जर या उपर ही सदर वास्तूंना संवरक्षित करण्यात आले नाही तर या पुढे पुरातत्व विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. व वेळ प्रसंगी सदर अधिकारीच्या तोंडाला काळे फासण्यात ही समाजवादी पार्टी मागे पुढे पाहणार नाहीत असे या निवेदनात म्हटले आहे.
पुरातत्व खाता औरंगाबादचे पत्र समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांना मिळाले. सामना नेण्यात जागा मिळाल्यास पुढचा काम करू व नेअमत ख्वानी महालचाही काम लवकरात लवकर करू असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Post a Comment