सावित्रीबाई फुले विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन व छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

जावेद शेख / राहुरी 
येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अमली पदार्थ विरोधी दिन आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थ म्हणजे काय व त्याचे होणारे परिणाम याबाबत जनजागृती करण्याची गरज भासण्याचे कारण मोठ्या शहरातील अनेक विद्यार्थी शालेय जीवनातच व्यसनाधीन झाले आहेत तसेच मित्राच्या संगतीने अनेक जण ह्या जाळ्यामध्ये अडकत आहेत व व्यसनाधीन युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत तरी या सर्वांचे दुष्परिणाम स्वतः च्या जीवनास आणी कुटुंबास हानिकारक आहेत तसेच अमली पदार्थ इतकेच मोबाईलचे व्यसनही घातक आहे यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे , एवढेच नव्हे, तर पालकांमध्येअसणारे व्यसन आपल्या प्रेमाने सोडायला लावावे

"आज ई-सिगारेट, विविध पेये अशा नव्या स्वरूपात व्यसनांचे प्रकार समोर येत आहेत, जे युवकांना आकर्षित करत आहेत. परिणामी अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी धर्मनिरपेक्ष व विवेक वादी व वैज्ञानिक दृष्टिकोन गुण आचरणात आणावे असे म्हणाले.
या प्रसंगी उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, रवी हरिश्चंद्रे, संदीप कुंभारे,तुकाराम जाधव, हलीम शेख, अनघा सासवडकर, सुरेखा आढाव,सचिन सिन्नरकर, बाबासाहेब शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण केली असून, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. 
या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थी कार्तिकी सोनवणे तर आभार प्रदर्शन  वाल्मिक कुलकर्णी याने केले. 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा