शिव, शाहू,फुले आंबेडकर विचारधारा प्रबोधन समितीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव आणी सन्मान करण्यासाठी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निमंत्रक नितीन मच्छिंद्र शिंदे (सरपंच), दादासाहेब अंबादास कांबळे, सौ.मोहिनी अशोक खैरे, सौ.सोनाली संतोष देवराय यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.अशोक (नाना) कानडे (कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघ तथा मा. नगरसेवक) आणी मा.बालाजी सोनटक्के साहेब (मा.सहा.आयुक्त,तपास अधिकारी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भास्कर लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.१४ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बेलापूर रोड येथील यशोधन या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालयात,सामाजिक कार्याबद्दल आदिवासी नेते मा. शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संतोष देवराय, पत्रकार मा. शौकतभाई शेख, मा.कार्लस साठे (सर), मेजर कृष्णा सरदार आदिंचा गौरवपर सन्मान करण्यात येणार आहे,
तरी या गौरव सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे शिव, शाहू, फुले आंबेडकर विचारधारा प्रबोधन समितीच्या वतीने आवाहनही करण्यात आले आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment