राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते- प्रा.चंद्रकांत कोतकर

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राजश्री शाहू महाराज सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी दीनदलितांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले असे उद्गार तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी काढले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ते बोलत होते. 
पुढे ते असेही म्हणाले की, राजर्षी शाहु महाराज यांनी दीनदलित समाजाला संस्थानामध्ये ५०% टक्के जागा दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था निर्माण केल्या. शेतकऱ्यांना कर्ज काढून दिले आणि शेतीचा विकास केला असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य डॉ .गुंफा कोकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य कर्तुत्व विशद केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कानपूरच्या क्षत्रिय समाजाने त्यांना "राजर्षी" ही उपाधी दिली. त्यांनी स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा कायदा केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. "मूकनायक" या अंकाला त्यांनी आर्थिक मदत केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत केली. बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. संगीत, कला, क्रीडा, सामाजिक न्याय, कृषी उद्योग, वेदोक्त अभ्यास , समता, बंधुता या अनुषंगाने राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जयंती विभागाचे प्रमुख प्रा.सतिश पावसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा