अहमदनगर - 35 वर्षापासून सलग मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली कार्यक्रम करणारे संगीतप्रेमी व रफी प्रेमी सईद खान यांनी यावर्षीही मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6-30 वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल मध्ये आज की शाम रफी के नाम या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सईदखान यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांची सदाबहार व अजरामर गीते अन्वर शेख, आबीद हुसेन, निलेश महाजन, अंजुम पटवेकर, अन्सार शेख, संजय भिंगारदिवे,मुख्तार शेख, विद्या तन्वर, ज्योती भिंगारदिवे, योगिनी अक्कडकर हे सादर करतील. तर समीर खान हे सूत्रसंचालन करणार आहे.कार्यक्रम वेळेवर सुरू होईल व सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याचे आयोजक सईदखान यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमात विशेष गुणवत्तेसह सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शिफा शेख अब्दुल अलीम व अमान शेख रफिक यांचा सन्मान करण्यात येईल.
Post a Comment