काचोळे विद्यालयाने काढली गुणवत्तेची दिंडी, सजवलेल्या रथात गुणवंतांची मिरवणूक

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
 श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची गुणवत्ता दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाने झांज पथक, ढोल पथक यांच्या गजरात स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप साठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे आदि या प्रसंगी उपस्थितीत होते.
           या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडाचे व ग्रंथांचे महत्त्व ओळखून त्यांना पालखीत पांडुरंगाबरोबर स्थान देत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा, वारकऱ्यांच्या वेशभूषा, करून वारीमध्ये सहभाग नोंदवला.
         विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मीनाताई जगधने म्हणाल्या की काचोळे विद्यालयाने  श्रीरामपूर शहरामध्ये आगळा वेगळा उपक्रम राबवला असून आषाढी एकादशी निमित्त गुणवंतांचा गुण गौरव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील. गुणवत्ता शिस्त व संस्कार ही काचोळे विद्यालयाची ओळख आहे. याच बरोबर विद्यालय महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती व परंपरा जोपासत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या संत लोकांची वेशभूषा, वारकऱ्यांची वेशभूषा, विठ्ठल रखुमाई बघून पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांनाच मिळाला.ही  रॅली शहराच्या मोरगे वस्ती परिसरात काढण्यात आली.
         या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सुमारे सोळाशे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत विद्यालयाची शिस्त व संस्कार याचे कौतुक केले.  पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केल्यामुळे वारी यशस्वी संपन्न झाली.

*वृत्त विशेष सहयोग*
सुनिल साळवे(सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा