'विचारवंतांच्या मुलाखती' या ग्रंथाचे गुरुवारी प्रकाशन

नगर : ख्यातनाम लेखक, कवी, जीवन मार्ग साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक कमिटीचे सदस्य कॉम्रेड सुभाष थोरात यांनी पुरोगामी चळवळीतील निवडक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या संपादित करून‘विचारवंतांच्या मुलाखती’ हा ग्रंथ वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. या ग्रंथाचे प्रकाशन गुरुवारी ( ता. ३१ जुलै ) संध्याकाळी ५ वा. सर्जेपुरा, नगर येथील रहेमत सुलतान हॉल येथे होणार आहे, अशी माहिती सोनाली देवढे – शिंदे यांनी दिली. 
संवादक सुभाष थोरात यांचे महिनाभरापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. निधनानंतर हे पुस्तक हाती आल्याने त्यांच्या पश्चात या ग्रंथाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी त्यांच्या समविचारी मित्र परिवाराने घेतली आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे या भूषविणार असून या कार्यक्रम प्रसंगी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या किरणताई मोघे आणि लोकसांस्कृतिक मंचचे कॉम्रेड सुबोध मोरे उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. सुधाकर शेलार आणि प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे हे समीक्षणपर भाष्य करणार आहेत. 
या पुस्तकाचे संपादन डॉ. श्रीधर पवार आणि राजीव देशपांडे यांनी केले असून तेही या कार्यक्रमासाठी येणार आहेत. सदर पुस्तक मुंबईस्थित ललित प्रकाशनने प्रकाशित केले आहे. 
'विचारवंताच्या मुलाखती' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला शहरातील सर्व पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, युवक, तरुण, महिला आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे महानगर प्रमुख इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जनसंसदचे अशोक सब्बन, सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई मेढे, युनूसभाई तांबटकर, ऍड. विद्या जाधव-शिंदे, आदि परिश्रम घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा