वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत कु. समीक्षा चव्हाणचे विशेष प्राविण्य

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सातारा - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सातारा येथील केंद्रात शिक्षण घेणारी तारळे गावची विद्यार्थिनी समीक्षा चंद्रकांत चव्हाण हिने वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत ७१.५० टक्के  गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळविले आहे. तिच्या या यशाबद्दल छत्रपती  शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे  यांनी तिचे अभिनंदन केले आहे..
समीक्षा चव्हाण ही छत्रपती शिवाजी कॉलेज च्या मराठी विभागाची  विद्यार्थिनी असून तिने वक्तृत्व,गायन,लेखन, साहित्य लेखन, सूत्र संचालन इत्यादी विविध कला प्रकारात कौशल्य आत्मसात केले आहे. आर्थिक परिस्थिती जरी चांगलीं नसली तरी आत्मविश्वास पूर्वक अभ्यास करून स्वतःच्या क्षमता वाढण्यासाठी ती सतत प्रयत्न करीत ती झुंज देत आहे. केवळ गुण मिळवणे या पेक्षाही कौशल्याने सिद्ध  होणे हे तिचे तिला आवडते. विविध प्रकारच्या लेख आणि बातम्या याद्वारे साताऱ्यातील विविध वर्तमानपत्रात लेखन केले आहे. समजात घडणाऱ्या विविध प्रकाराच्या गोष्टींवर कटाक्ष टाकून त्या गोष्टी आपल्या भाषेत मांडता यायला हव्यात यावर तिचा कायम भर असतो. 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सातारा केंद्राचे मधुसूदन पतकी सर आणि जयंत लंगडे सर यांनी तिला अध्यापन आणि मार्गदर्शन केले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे सर, प्रा.डॉ. आबासाहेब उमाप सर, प्रा.डॉ. विद्या नावडकर मॅडम, प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे सर, प्रा. श्रीकांत भोकरे सर, प्रा.प्रियांका कुंभार मॅडम इत्यादीनी प्रोत्साहन दिले आहे. 
समीक्षा हिच्यावर सध्या भावी आयुष्यातील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गावात अनेकांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा