बहुजन शिक्षण संघ संचलित शंभुक विद्यार्थी वसतिगृह श्रीरामपूर येथे माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, पंचायत समितीच्या माजी सभापती संगिताताई शिंदे, दत्तनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सारिकाताई कुंकूलोळ यांच्या हस्ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अनुक्रमे गणवेश, वह्या, राईटींग पॅड,पेन,पेन्सिल,खुड रबर, टॉवेल इ.साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्नेहग्रुपचे अध्यक्ष गोरक्षनाथ बनकर, उपाध्यक्ष भागचंद औताडे, सचिव चंद्रकांत मगरे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदिप मगर, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सलिम शेख, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संजय गांगड, माजी बॅंक व्यवस्थापक नानासाहेब शेवाळे, भगतसिंग ब्रिगेड चे अध्यक्ष कृष्णा बडाख, क.जे. सोमैया हायस्कूल चे मुख्याध्यापक भुषण गोपाळे सर, कल्याण लकडे सर, प्रा. सुनिल वाघमारे, प्रमोद गाडेकर, समीर मुथा, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचा वसतिगृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी विद्यार्थ्यांना पाऊच व डि व्हिटॅमिन च्या गोळ्याचे वाटप केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ दिवे, मारीया बर्वे, आर्यन घुले,ओम कटारनवरे, अर्जुन पवार,शिवम माळी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिल वाघमारे यांनी केले.
*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव दिवे (सर) श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment