आठवडे बाजारात ठरवून दिलेल्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणी रस्त्यावर दुकाने लावून बसू नका !श्रीरामपूर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आज शुक्रवार श्रीरामपूरचा आठवडे बाजार असून या बाजारामध्ये नगरपालिकेने निश्चित केलेले ठिकाणीच विक्रेते व शेतकरी यांनी आपली दुकाने लावावीत, बाजारतळाशिवाय इतर ठिकाणी कोणी दुकाने लावून बसू नये. विशेषत: नवीन मराठी शाळा रोड व संजीवन हॉस्पिटल रोडवर कुणीही आपली दुकाने लावू नये अन्यथा नगरपालिकेला कारवाई करणे भाग पडेल. त्याऐवजी म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर नगरपालिकेने आठवडे बाजार करीता ज्या ठिकाणी जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी बाजारासाठी येणारे विक्रेते व शेतकरी यांनी दुकाने लावून याबाबत पालिकेस सहकार्य करून रहदारी विस्कळीत होणार नाही यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.
श्रीरामपूरचा आठवडे बाजार शहराच्या विविध भागात खूपच विस्तारला असून नवीन मराठी शाळा रोड तसेच संजीवन हॉस्पिटल पासून शिवाजी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने विक्रेते बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. याबाबत शहरवासी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने गेल्या आठवड्यापासून नगरपालिकेने या दोन्ही रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास मनाई केली आहे. मोठा रहदारीचा रस्ता असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे हे सर्व टाळण्यासाठी विक्रेत्यांनी या दोन्ही रस्त्यावर बसू नये त्याऐवजी बाजारतळाची मुख्य जागा त्याचप्रमाणे म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर दुकाने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्या ठिकाणी विक्रेते आपली दुकाने लावू शकतात असेही म्हटले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार सलिमखान 
 पठाण (सर) श्रीरामपूर 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा