वरुड (जि.अमरावती) १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम ही राज्य विभाग जिल्हा व तालुका स्तरावरील एकूण १२५०० शासकीय कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार यशस्वीपणे राबविण्यात आली.या अंतर्गत शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत खालील मुद्दांवर मूल्यमापन करण्यात आले त्यानुसार कार्यलय संकेतस्थळ, सुखल जीवनमान कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी व नाविन्यपूर्ण उपक्रम अशा विविध उपक्रमे राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमरावती महसूल विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून विभागीय स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरूड (जि.अमरावती) येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अमोल वैकुंठराव देशमुख यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम महसूल तथा पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, खा.डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आ.उमेश यावलकर, आ. प्रवीण तायडे, आ. राजेश वानखेडे, आ. श्री. लवटे, आ.संजय खोडके आणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
*वृत विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق