शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त प्रतापनाना भोसले यांची लंडन येथील डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
श्रीरामपूरचे मूळ रहिवासी व सध्या अमेरिकास्थित असलेले उद्योजक तथा शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापनाना भोसले यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला नुकतेच सपत्नीक भेट दिली.
       यावेळी अनुभवकथनात त्यांनी  सांगितले की,राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ५५ वर्षापासून चालू असलेल्या लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ताब्यात घेण्याच्या लढ्याला यश मिळवून दिले.
गेल्या ५५ वर्षापासून हे स्मारक राज्य सरकारच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न चालू होते अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मनावर घेत राजकीय ताकद लावून हे स्मारक राज्य सरकारच्या ताब्यात आणले आहे.यामुळे घटनाकारांची किर्ती सातासमुद्रापारही महाराष्ट्रातील जनतेला पाहता येणार आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे शक्य झाले असे कौतुकास्पद गौरवोद्गार शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व अमेरिकास्थित उद्योजक श्री.प्रतापनाना भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा