शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या कारभाराची ला.प्र.वि मार्फत चौकशी करावी

नगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्याक संस्थांकडून पाठविण्यात येणाऱ्या शिक्षणसेवकांच्या प्रस्तावांनाजिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडून   जाणूनबुजून अडवून ठेवण्यात येत आहे त्याची चौकशी लाच लुचपत प्रतिबंध विभागामार्फत करण्याची मागणी  सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे.  

शिक्षणाधिकारी पाटील यांच्या कार्यालयात शिक्षणसेवकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी उघडपणे एजंट कडून तीन  लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याची चर्चा सुरु आहे. एवढेच नव्हे तर, कार्यालयाच्या बाहेर काही एजंट  फिरताना दिसतात. हे एजंट संस्थांना व उमेदवारांना प्रस्ताव मंजुरी व शालार्थ आयडीसाठी लाच देण्याचे सूचित करतात, या प्रकार कडे  नगरचे लाच लुचपत प्रतिबंध विभागा कार्यालयाचे  दुर्लक्ष होत आहे  प्रकरणी शेख यांनी पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंध विभाग. शिक्षण आयुक्त.शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे शेख यांनी नुकताच शिक्षण संचालक श्री शरद गोसावी यांची समक्ष भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे त्यांनी प्रलंबित प्रकरणाबाबत शिक्षणाधिकारी पाटील यांच्याकडे विचारणा केलेली आहे व
 नगर येथील जकेरिया आघाडी प्राथमिक शाळा (यतीमखाना ॲण्ड बोर्डिंग) यांनी दोन शिक्षणसेवकांचे प्रस्ताव 3 मार्च 2025 रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवले होते. (प्रस्ताव क्रमांक  141/2024-25 व 142/2024-25). मात्र हे प्रस्ताव मंजूर न करता गेल्या पाच महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षणसेवकांना अद्याप मानधन मिळालेले नाही.
शेख यांनी आरोप केला आहे की,  शिक्षणसेवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अल्पसंख्याक संस्थांच्या सर्व प्रलंबित प्रस्तावांची तपासणी करावी, कार्यालयाबाहेर फिरणाऱ्या एजंटांची गोपनीय माहिती मिळवावी, प्रस्ताव कधी दाखल झाले व त्यांना मंजुरी देण्यासाठी किती उशीर लावला गेला याची पडताळणी करावी, पाटील यांनी रुजू झाल्यापासून आज पर्यंतचे  मंजूर केलेले प्रकरणाची सखोल चौकशी लाच लुचपत प्रतिबंध विभाग मार्फत याची निष्पक्ष  व्हावी, अशी मागणी  शेख यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा