राजस उद्योग समूहाचे संचालक राजू आर.घुले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

नगर - अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित राजस उद्योग समूहाचे संचालक राजू आर. घुले यांना बर्लिंगटन इस्टेट युनिव्हर्सिटी युएसए कडून मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. याबद्दल त्यांचा नवी दिल्ली येथे विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
नवी दिल्ली येथे दिनांक २७ जुलै २०२५ रोजी झालेला इस्टेट युनिव्हर्सिटी युएसए तर्फे आयोजित भव्य समारंभात राजस उद्योग समूहाचे संचालक राजू आर. घुले यांना ऑनरी डॉक्टरेट पीएचडी विथ गोल्ड मेडल या मानद पदवीने गौरविण्यात आले.या मानद पदवीद्वारे श्री. घुले यांचे बिझनेस मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक अ‍ॅडव्हायजरी आणि क्वालिटी एक्सलन्स या क्षेत्रातील योगदान जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले. हा सन्मान इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे संपन्न कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेसन हॉल (उच्चायुक्त, जमैका दूतावास, भारत) हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.दिनेश शर्मा, (राज्यसभा सदस्य व माजी उपमुख्यमंत्री, उत्तर प्रदेश), गेशन दिसानायके, (मंत्री-सल्लागार, श्रीलंका उच्चायोग, नवी दिल्ली), राजीव शर्मा,(आयएएस निवृत्त),सी. बी. तिवारी,(गृह मंत्रालय, भारत सरकार),अति. पो.आयुक्त प्रमोद सोनकर (म.प्र.),सौ. अलका सोनकर, (अधीक्षक, इंदूर सेंट्रल जेल),डॉ. पी. के. राजपूत, (माजी वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅडिला फार्मा), श्रीमती एलेना बर्मन, (अध्यक्ष,आयएआरसी),डॉ. विक गॅफनी,(कायदा शास्त्रज्ञ, ऑस्ट्रेलिया), इंदौर/ऑक्सफोर्ड इंटरनॅशनलचे डॉ. पुनीत कुमार द्विवेदी आणि डॉ. नेहा शर्मा आदि  उपस्थित होते.
या सन्मानामुळे राजू घुले यांचे कार्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरवले गेले असून, त्यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा