नगर - जागतिक स्तनपान सप्ताह निमित्ताने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, अहिल्यानगर महानगरपालिका, आणि अहमदनगर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब देशपांडे रुग्णालय अहिल्यानगर येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका यशवंत डांगे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्तनपानाचे बालकांच्या पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि आई-बाळ नात्याच्या दृढीकरणासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. तसेच समाजात या विषयावर व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.व आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी अहिल्यानगर महानगरपालिका डॉ.सतीश राजुरकर, डॉ. जयंत देशमुख, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल रोटेरियन सुनिल कटारिया, सचिव रोटेरियन अमर गुरप, रोटेरियन डॉ.उज्वला शिरसाठ, रोटेरियन डॉ.नीलिमा,बागल,रोटेरियन डॉ. दिलीप बागल, रोटेरियन डॉ.श्रेया खजगीवाले , रोटेरियन मधुबाला चोरडिया अध्यक्षा इनरव्हील क्लब
तसेच रोटेरियन सदस्यांमध्ये विनोदभाई बोरा, सुनील मुथा, संजय मुनोत, वसंत मुनोत, श्री भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील परिचारिका, अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विखे पाटील फाउंडेशनचे डॉक्टर व परिचारिका, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, तसेच अहिल्यानगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात रोटेरियन सुनिल कटारिया (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल) यांच्या प्रास्ताविकाने झाली.
प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. उज्वला शिरसाट (बालरोगतज्ञ) यांनी बालकांच्या आरोग्यासाठी पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपानाचे महत्त्व सांगितले.
डॉ. नीलिमा बागल (स्त्रीरोगतज्ञ) यांनी स्तनपानातील अडचणी,मातांची काळजी आणि सहकार्य यावर मार्गदर्शन केले.
डॉ.श्रेया खजगीवाले (बीएएमएस) यांनी प्रसूतीनंतरच्या काळातील आहार, विश्रांती आणि स्तनपानातील टिप्स सांगितल्या.
आयुक्त यशवंत डांगे यांनी समाजात आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले.
हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, “स्तनपान: जीवनाची भक्कम पायाभरणी” हा जागतिक संदेश स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यात आयोजक यशस्वी ठरल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचा समारोप रोटेरियन अमर गुरप (सचिव) यांनी दिलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.
Post a Comment