नगर - नागपूर पुणे वंदे भारत बुलेट ट्रेन सुरू झाल्याबद्दल अनेकांनी श्रेयवादच्या नादात सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला, परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे तो आनंद किती फसवा आणि निरुपयोगी आहे त्याविषयी...
_____________
काल परवा पुणे नागपूर वंदे भारत गाडी सुरू करण्याची घोषणा झाली त्यामध्ये अहिल्यानगर चा आणि येथील नेतेमंडळींचा खरे म्हणजे काहीही संबंध नाही, तरी पण सोशल मीडियावर अनेक मंडळी त्या गाडीचा उद्देश त्याचे टाईम टेबल याचा अभ्यास न करता, आणि समर्थनिय श्रेय घ्यायच्या नादात आनंद व्यक्त करू लागली..
परंतु ही गाडी नगरकरांसाठी अजिबात उपयोगाची नाही याला कारण असे की..
वास्तविक त्यापैकी कोणीही त्या गाडीच्या वेळा त्याचे टाईम टेबल नीट पाहिले देखील नाही., या गाडीच्या तिकीट प्रणाली विषयी माहिती घेतली नाही,
या गाडीचा आपल्या अहिल्यानगर स्टेशन वरून पुण्याला जायचा आणि यायचा टाईम बिलकुल कुणालाही कशाच्या ही बाबत सोयीचा नाही...
त्यामुळे नगर पुणे इंटरसिटी चा हा तसूभरही पर्याय कधीच असू शकत नाही.
त्याचे टाईम टेबल जरा लक्षपूर्वक पाहिले म्हणजे समजेल की आपल्या अहिल्यानगर स्टेशन वरून ही गाडी संध्याकाळी साडेसात वाजता निघून रात्री दहा वाजता पुण्याला जाणार आहे आणि नंतर
पुण्याहून ही गाडी पहाटे साडेसहा वाजता निघणार आहे , आणि नगरला सकाळी साडेआठ वाजता येणार आहे.. मग या गाडीने नगरकर पुण्याला काय रात्री फक्त मुक्कामाला पुण्याला जातील काय?
आणि तिथे रात्रभर झोपून पहाटे सहालाच उठून परत मागे येतील काय?
हे काय कामकाजाचे टाईम आहे का?
दुसरे म्हणजे या गाडीला ऐनवेळी साधे तिकीट मिळू शकत नाही, याला फक्त रिझर्वेशनच करावे लागते, आणि याच्या तिकिटाचा कमीत कमी चार्ज वंदे भारत च्या ठरवलेल्या नियमांनुसार पाचशे रुपये असू शकतो...
हे कुणाला माहित आहे का?
या गाडीच्या वेळा नगर पुणे प्रवासाला कुठल्याही बाबतीत अजिबात सोयीस्कर आणि योग्य नाहीत,
अर्थात नगर पुणे प्रवास डोळ्यासमोर धरून या गाडीची उद्घोषणा मुळीच करण्यात आलेली नाही, हे लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे, केवळ पुणे नागपूर प्रवास जलद गतीने व्हावा म्हणून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे. त्यामुळे उगीचच नगर पुणे, नगर पुणे असा प्रवास जणू याच गाडीमुळे सोपा झाला अशी जनतेची समजूत करून देऊन श्रेय वादाच्या नादात उगीचच अजिबात संबंध नसलेल्या गाडीबाबत आनंद व्यक्त करण्यात काहीही अर्थ नाही.
वास्तविक सध्या पुण्याहून नागपूरला तीन चार एक्सप्रेस ऑलरेडी नियमीत धावतच आहेत. पुणे नागपूर, गरीब रथ, आजाद हिंद वगैरे..
आणि पुण्याहून दररोज किमान तिनशे लक्झरी बसेस रोज नागपूरला जातात..
तरीदेखील पुणे नागपूर साठीच अजून एक वंदे भारत विद्वान रेल्वे मंत्रालयाला का सुरू करावीशी वाटली काही समजत नाही.
नगर पुणे रस्ता वाहतूक प्रवासाची गंभीर दुरावस्था अजूनही कोणालाच समजलेली नाही., म्हणून तर रेल्वे मंत्रालयाकडून सावत्र आईचे लेकरं असलेल्या नगरकरांच्या मागणी कडे सतत दुर्लक्ष केले जाते.. आणि भलतीच आष्टी सारखी गाडी काहीतरी सुरू केली जाते.. जखम मांडीला आणि मलम शेंडीला....
नगरचे लोक फार फार तर या वंदे भारत ने शेगांव चा विचार करू शकत होते, तर त्यासाठी या गाडीला शेगांवला थांबा देखील नाही..
आजच्या मितीला पुणे नगर दरम्यान अशा किमान दहा रेल्वे गाड्या नगरकरांच्या दृष्टीने गैरसोयीच्या आणि अवेळी धावतच आहेत, परंतु त्यापैकी नगरहून सकाळची अमरावती पुणे आणि पुण्याहून संध्याकाळची तिकडून येणारी झेलम वगळता एकही गाडी नगरी जनतेसाठी कामाची नाही..
नगर पुणे हा अवघा 120 किलोमीटर चा आजचा प्रवास जो तब्बल सहा तासाच्या घरात पोहोचलेला आहे, तो जर आता सुखकर करायचा असेल तर सकाळी लवकर पुण्याला जाणारी आणि पुण्याहून संध्याकाळी निघणारी इंटरसिटी रोज सुरू होणे हाच त्याला एक मात्र पर्याय आहे.,
वंदे भारत एक्सप्रेस हा लांब पल्यांची अंतरे लवकर कापण्यासाठी आयोजित केलेला उपाय आहे.. त्याचे नगर पुणे प्रवासाशी काही देणे घेणे नाही,
त्यामुळे उगीचच सिमल्या मध्ये बर्फ पडला म्हणून इकडे नगरमधे स्वेटर घालण्यात अर्थ नाही.
आम्ही गेल्या पाच वर्षापासून नगर पुणे प्रवासाच्या बाबत अनेक आंदोलन करीत भीषण वास्तव मांडत आलेलो आहोत.
पण प्रशासनाकडून ठोस उपाययोजना ना रस्ते वाहतुकीच्या बाबत घडते आहे, ना पर्यायी रेल्वेच्या बाबत घडते आहे.
उलट हास्यास्पद प्रकार असा आहे... आपल्या स्टेशनवर दररोज उभे असलेली आष्टी रेल्वे यामध्ये ७०० प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीतून सात देखील प्रवासी प्रवास करत नाही, जी दररोज जवळजवळ मोकळी धावते..
अशी ही आष्टीला जाणारी डेमु रेल्वे मात्र लाखो करोडो रुपयांचा तोटा सोसुन रोज 70 ,80 हजार रुपयांचे डिझेल जाळून आजही गेल्या तीन वर्षापासून दररोज चालू आहे..
आजपर्यंत तुमच्या आमच्या करातून आणि घरातून कापलेल्या पैशातून या तीन वर्षात सरासरी 10 कोटी रुपयांचे डिझेल रेल्वेने फुकट तोट्यात जाळले आहे...
नगर पुणे इंटरसिटी मात्र अजून दोन-तीन वर्षे सुरू होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची वाहतूक अजून दोन-तीन पटीने वाढेल आणि तिचाही उपयोग होणार नाही..
लहरी राजा.. प्रजा आंधळी अधांतरी दरबार ..अजब तुझे सरकार!
_ सुहासभाई मुळे
अध्यक्ष
जागरूक नागरिक मंच
9002668555
Post a Comment