शब्दगंध साहित्य पुरस्कार पुस्तकं पाठवण्याचे आवाहन

अहिल्यानगर: “शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती पाठवाव्यात,उत्कृष्ट साहित्यकृतीना शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ” अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
      गेल्या वीस वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय वाड:मय स्पर्धा घेण्यात येतात.यावर्षी एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, लेखसंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, संशोधन ग्रंथ,ललितसंग्रह,बालवाड:मय इ प्रकारातील पुस्तकांच्या तीन प्रती,परिचय,५ रु पोस्टाची ५ तिकिटे यासह शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,भिस्तबाग महालाजवळ,तपोवन रोड, सावेडी अहिल्यानगर – ४१४००३ मो.क्र.९९२१००९७५० येथे पाठवाव्यात,परिक्षण झाल्या नंतर सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात लेखक,कवींना  शब्दगंध साहित्य पुरस्कार देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.सन्मानपत्र. सन्मान चिन्ह,शाल असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे. 
      तरी जास्तीत जास्त नवोदितांनी शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावेत,असे आवाहन कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडूळे,उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,कार्यवाह भारत गाडेकर,खजिनदार भगवान राऊत, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा