उम्मीद पोर्टल मध्ये नोंदणीसाठी मोफत कॅम्प कार्यक्रम संपन्न

नंदुरबार / प्रतिनिधी:
नंदुरबार शहरात मदरसा रियाजुल बनात अली साहब मोहल्यात राज्यातील वक्फ मध्ये नोंदणी झालेले असे सर्वच मस्जिद,दर्गाह, मदरसे व कब्रस्तानाची नोंदणी उम्मीद पोर्टलवर करावी असे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष नामदार समीर काजी यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व मस्जिद, दर्गाह, मदरसे, कब्रस्तानाची दि.५ डिसेंबर २०२५ पर्यंत उम्मीद पोर्टल वर १००% करुन घ्यावी, नोंदणीबाबत दुर्लक्ष करु नये, करीता गाफील न राहाता वरील प्रमाणे सर्व वक्फ मध्ये जे जे नोंदणी झालेले आहेत त्यांनी तात्काळ आजच उम्मीद पोर्टलवर नोंदणी करावी असेही म्हटले आहे.
याकरिता नंदुरबार शहरातील मदरसे रियाजुल बनात अली साहेब मोहल्यात उम्मीद पोर्टल चे ऑनलाईन मोफत नोंदणी कॅम्प, धुळे - नंदुरबार वक्फचे विभागीय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी वक्फ चे अधिकारी हबीबुर रेहमान व येतेशाम अन्सारी कॅम्पमध्ये ऑनलाईन नोंदणीचे काम करत होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद अन्सारी, नंदुरबारचे धाव शा शा तकिया मस्जिद संस्थेचे अध्यक्ष एजाज बागवान, मदरसे रियाजुल बनात चे अध्यक्ष अहमद सईद आदि मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजक जमियात उलमाये हिंद चे नंदुरबार अध्यक्ष मौलाना जकरिया सहाब, सचिव हाजी इरफान मेमन हे होते.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद मतीन, जुबेर मणियार,शकील शेख आदींनी केले.

*वृत्त विशेष सहयोग*
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा