खातगाव टाकळी येथील 4 वर्षांच्या झोहन गुफरान शेख यांचा पहिला रोजा यशस्वी

खातगाव टाकळी येथील अवघ्या 4 वर्षांच्या झोहन गुफरान शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात आपला पहिला रोजा पूर्ण करून कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे. इतक्या लहान वयात उपवास पूर्ण केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
झोहन हे गुफरान रफीक शेख व जौफीन गुफरान शेख यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे आजोबा रफीक सत्तार शेख असून आजी माहेमुबिन रफीक शेख या कोपरगाव येथील मौलाना मुनीर उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. कुटुंबात धार्मिक वातावरण असल्यामुळे लहान वयापासूनच झोहन यांना नमाज व रोजाबद्दल प्रेरणा मिळाली.
झोहन यांच्या वडिलांचा पोल्ट्री फार्म व्यवसाय असूनही कुटुंबाने धार्मिक शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. पहिला रोजा पूर्ण केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
इतक्या लहान वयात दाखवलेली जिद्द आणि श्रद्धा निश्चितच इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा