आयेशा हसन इनामदार याने पुर्ण केला रमजानचा पहिला रोजा

श्रीरामपूर | प्रतिनिधी
मिल्लतनगर, वॉर्ड क्रमांक 1 येथील अवघ्या पाच वर्षांच्या आयेशा हसन इनामदार हिने रमजान महिन्यात आपला पहिला रोजा पूर्ण ठेवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतक्या लहान वयात तिने दाखवलेली श्रद्धा आणि चिकाटी पाहून कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे.
आयेशाने उत्साहाने आणि आनंदाने आपला पहिला रोजा पूर्ण केला. दिवसभर संयम राखत तिने रोजा पूर्ण केल्याने घरातील वातावरण आनंदमय झाले. तिच्या या प्रयत्नाचे विशेष कौतुक तिचे आजोबा हुसेन नूरमोहम्मद इनामदार, चाचा तसेच मोहल्ल्यातील नागरिकांनी केले.
स्थानिकांनी सांगितले की, “अवघ्या पाचव्या वर्षी आयेशाने ठेवलेला पहिला रोजा ही अभिमानाची बाब आहे. तिच्या या प्रयत्नामुळे इतर लहान मुलांनाही प्रेरणा मिळेल.”
आयेशाच्या या छोट्या पण प्रेरणादायी कृतीमुळे मिल्लतनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिच्या जिद्दीची चर्चा होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा