शरद पोंक्षे आणि मनुस्मृतीच्या प्रतिमेचे दहन; वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचा एल्गार

नगर - अभिनेता शरद पोंक्षे यांनी मनुस्मृतीच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा अहिल्यानगर मध्ये तीव्र निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शरद पोंक्षे आणि मनुस्मृतीच्या प्रतिमेचे दहन करून आपला संताप व्यक्त केला. आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक अभिवादन करून करण्यात आली.
       वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी यावेळी बोलताना पोंक्षे यांच्यावर "गोबर भक्त" अशी टीका करत अत्यंत परखड भूमिका मांडली. ते म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळात मनुस्मृती जाळली होती, त्या ऐतिहासिक घटनेचा अवमान करण्याचे काम पोंक्षे यांनी केले आहे. मनुस्मृती हे केवळ एक पुस्तक नसून ते विषमतेचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे, असे साठे यांनी यावेळी निक्षून सांगितले." यावेळी ते पुढे म्हणाले, "ज्या ज्या वेळी शरद पोंक्षे सारख्या व्यक्ती महापुरुषांच्या विचारांची प्रतारणा करतात, तेव्हा इथले आंबेडकरवादी शांत का बसतात? तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी करता का?" त्यांनी इशारा दिला की, जर पोंक्षे यांनी माफी मागितली नाही, तर अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांचे कोणतेही कार्यक्रम होऊ दिले जाणार नाहीत आणि दिसल्यास त्यांना काळे फासले जाईल.
       भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी स्पष्ट केले की, मनुस्मृतीने बहुजन समाजाला गुलामगिरीत ठेवले होते, तिचे समर्थन खपवून घेतले जाणार नाही. प्रशासनाने पोंक्षे यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अन्यथा होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील. शहराध्यक्ष दीपक पाटोळे यांनी पोंक्षे यांच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "आधी मनुस्मृती नीट वाचा आणि मगच महामानवांच्या कृतीवर भाष्य करा," असा सल्ला दिला.
हे आंदोलन योगेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे योगेश क्षीरसागर, राजीव भिंगारदिवे, मनोज साळवे, अमर निर्भावाने, संदीप वाघमारे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दीपक पाटोळे, गोरख केदारे, रवींद्र कांबळे, दीपक गायकवाड, वसंत मेघदंबर, मोहन शिरसाठ, गौतम पाचारणे, अविनाश राक्षे, युवराज बनसोड, राहुल कांबळे, राहुल पडागळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" आणि "मनुस्मृती मुर्दाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा