राहुरी / अहमदनगर : “ शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.कैलास कांबळे,कार्याध्यक्षपदी प्राथमिक शिक्षिका सौ.जयश्री झरेकर – इंगळे तर सचिवपदी बाळासाहेब मन्तोडे यांची निवड करण्यात आली" असल्याची माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली. शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राहुरी तालुका शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली,यावेळी शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत,किशोर डोंगरे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मिराबक्ष शेख,राज्य प्रतिनिधी डॉ.महावीरसिंग चोहान इ मान्यवर उपस्थित होते.कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे अध्यक्ष - प्रा.डॉ.कैलास कांबळे,कार्याध्यक्ष - सौ.जयश्री झरेकर – इंगळे, उपाध्यक्ष - विकास गभाले, सौ.मनीषा गोसावी,सचिव - बाळासाहेब मन्तोडे,सहसचिव - प्रशांत सूर्यवंशी,खजिनदार - शर्मिला रणधीर, कार्यकारणी सदस्य - श्रीमती सुलोचना गाडेकर,अतुल गोसावी,प्रभाकर मकासरे,क्रांती करंजीकर,स्वाती जोशी, प्रतिभा बोबे,ज्ञानेश्वर बनसोडे,प्रसिद्धी समन्वयक बाळकृष्ण भोसले,सल्लागार भाऊसाहेब साबळे यांची निवड करण्यात आली.
إرسال تعليق