काय गंमत असती राव...

आज्ज्या-पनज्यांपास्नं परदेशात जाऊन र्‍हायलेल्या.. भारताची आठवनबी न येनार्‍या कुनी बाप्यानं नायतर बाईनं, अमेरीकेत एखादं इलेक्शन जिंकलं-पद मिळवलं की "भारतीय वंशाचे","भारतीय वंशाच्या" म्हनून किंचाळत पायचाटू कौतुक करन्यात आमी फुडं असतो... 

आनी त्याचवेळी, आपल्या प्रेमासाठी परदेशातून भारतात येऊन..भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन..भाषेपासुन पेहरावापर्यन्त आणि संस्कारांपासून आचारविचारांपर्यन्त अस्सल भारतीयत्व अंगीकारणार्‍या व्यक्तीला मात्र हिनवन्यात, बदनाम करन्यात, हेटाळन्यात आपन मागं पडत नाय !

 ...पन अशा परिस्थीतीतबी टीकेचे सगळे वार झेलून तिनं आपलं 'भारतीयत्व' जपलं. कारण ते तिनं तिच्या जोडीदारावरच्या प्रेमासाठी स्विकारलं होतं. शिनेमातली प्रेमं फिकी पडतील अशी नादखुळा लव्ह श्टोरी होती ती भावांनो ! १९ वर्षांची होती ती. केंब्रीज युनिव्हर्सिटीत शिकत असताना इटालीयन फूड खान्यासाठी मैत्रीनींबरोबर एका ग्रीक रेस्टाॅरंटमध्ये गेली होती. तिथं योगायोगानं राजीव गांधी नांवाचा पोरगाबी मित्रांसोबत आलावता.. तिला बघितलं आनि त्यो बघतच र्‍हायला... बघतSच र्‍हायला.. त्याच्या डोक्यात जनू गिटार वाजायला लागलं - 'तुझे देखा तो ये जाना सनम !'.. अस्लं कायतरी व्हायला लागलं..
 राजीवनं तिथं असलेल्या रूमालावर तिच्यासाठी एक कविता लिहीली आनी वाईनच्या बोटलसोबत तिच्याकडं पाठवली... तिला बी पोरगा बरा वाटला.. तिला म्हाईतबी नव्हतं की ह्यो भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा हाय ! कसं म्हाइत असनार? कुनालाच म्हाईत नव्हतं.. त्याच्या मित्रांनाबी !! कारन त्यो इतर सर्वसामान्य पोरं र्‍हात्यात तसा काटकसरीत रहात होता.. फावल्या वेळात आईस्क्रीम विकून पाॅकेटमनीसाठी पैसे साठवत होता !!!

..तिला बी ह्यो देखना, साधासरळ, कष्टाळू पोरगा आवडला. मैत्री झाली.. प्रेमात रूपांतर कधी झालं कळलंच नाय... त्याच्या प्रेमाची जादू एवढी जबरदस्त होती की ती आपला देश, आपली मानसं, आपली माती सगळं सोडून भारतात आली.. हितंं नव्यानं रूजली.. आपल्या जोडीदाराचा देश, त्याची मानसं, त्याची माती, त्याची नाती हाय तशी स्विकारली... त्याच्यानंतरबी तिनं हे सगळं घट्ट धरुन ठेवलं... त्याच्या स्वप्नांसकट !!!

मला बाकी राजकारनातलं काय कळत नाय भावांनो, पन का कुनास ठावूक, या एका गोष्टीसाठी या अफलातून बाईविषयी लै लै लै आदर वाटतो !

वाढदिवसाच्या लै लै लै मनापासून शुभेच्छा, सोनियाजी

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा