कोपरगाव - शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या कोपरगाव शाखेच्या वतीने शनिवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त
कविता वाचन समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे परिषदेच्या अध्यक्षा सौ. ऐश्वर्यलक्षमी सातभाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शाळा महाविद्यालयीन साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, कोपरगाव शाखेच्या वतीने नवोदित लेखकांना प्रोत्साहन,मार्गदर्शन करताना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, नवोदित लेखकांना पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मदतीचा हात दिला जातो, म्हणून तालुक्यातील सर्व नवोदित लेखक व साहित्यिकांनी कविता वाचन करण्यासाठी शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता स्व. र.म. परिख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालय, इनडोअर गेम्स हाॅल येथे उपस्थित रहावे, असे शब्दगंध परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Post a Comment