छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास ग्रामिण भागात जाणे आवश्यक : डॉ सोनावणे छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३८ व्या पुण्यतिथीचे स्मायलिंग अस्मिताचे आयोजन

छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने छ्त्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या १३८व्या पुण्यतिथीनिमित्त इतिहास संशोधक नवनाथ वाव्हळ यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सतिष सोनावणे, महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, इतिहास प्रेमी मुन्नाकाका चमडेवाले, हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी, अभिजित दरेकर आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत समाजसेवी युवराज गुंड उपस्थित होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी अहमदनगरच्या किल्ल्यात कटाने दिवान महादेव बर्वे आणि ब्रिटिशांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा खून केला. याला १३८ वर्षे झाली तरी देखील छत्रपतींचा इतिहास पुढे आलेला नाही. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तो इतिहास आता पुढे येत आहे हा इतिहास कठीण काळातील संघर्षाचा आहे.सध्या हवामान बदल, नापिकीमुळे ग्रामिण भागात कठीण परिस्थिती आहे;त्यामुळे हा इतिहास ग्रामिण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राज्यातील नामवंत कर्करोग तज्ञ डॉ सतिष सोनावणे यांनी व्यक्त केला. यावेळी इतिहास संशोधक नवनाथ वाव्हळ यांनी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा कुणालाही माहीत नसलेला इतिहास सांगितला तो ऐकत असताना किल्ल्यात घडलेला प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला आणि अंगावर रोमांच उभे राहिले.अगदी कोवळ्या वयात छत्रपतींचे अतोनात हाल झाले असे म्हणत स्मायलिंग अस्मिताने १३ वर्षांपासून सुरू केलेले छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाच्या नुतनीकरणाचे काम खूपच उत्कृष्ट आहे असे मत अहमदनगर महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात यशवंत तोडमल म्हणाले की छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक हे संघर्ष आणि स्वातंत्र्याचे प्रतिक आहे.त्याचे आधुनिकीकरण सध्या संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे याचा अभिमान आहे.काहींना छत्रपतींची आठवण फक्त पुण्यतिथीलाच येते.इतरवेळी सुध्दा सर्वांनी स्मारकाच्या नुतनीकरणाच्या कामाला हातभार लावत छत्रपतींचे ऋण व्यक्त करावे. आभार प्रदर्शन स्मारक समितीचे सचिव रिनुल नागवडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी गौरव नरवडे,श्रीपाद दगडे,सागर घोरपडे, सचिन सापते, अशोक चिंधे, सतिष फंड, योगेश्वर गागरे, संभाजी कदम, शुभम मिसाळ,अक्षय शेळके, अक्षय कांडेकर, बंटी मोरे महेश कांबळे आदींसह इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा