दिनांक 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील संपूर्ण शाळा सरसकट 15 फेब्रवरी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा संघटनेने तात्काळ संस्थाचालकांची दिनांक ११ व १२ जाने. २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा पातळीवर बैठका बोलवल्या होत्या.
या बैठकीमध्ये गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या सबबीखाली मुलांचे मोठ्या प्रमाणात झालेले शैक्षणिक व भावनिक नुकसान तसेच पालकांची शाळा बंद न करण्याची आग्रहाची मागणी आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व चर्चेअंती सर्वानुमते कोरोना रुग्ण नसलेल्या भागात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत पालकांच्या संम्मती घेऊन व शाळा निरंतर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हयातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोवीड-१९ संदर्भातील सावधगिरी चे सर्व नियम पाळून सुरु ठेवण्यात याव्या व विद्याथ्र्यांचं आधीच प्रचंड झालेले नुकसान पुन्हा होऊ न देण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला, शाळा बंद न करण्यासंदर्भाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यांच्या मार्फत मा. ना. उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना देण्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले.
आज या बैठकांमध्ये घेतलेल्या या निर्णयाला पाठिंबा देत दिनांक १७ जानेवरी सोमवार रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील संस्थाचालकांनी इंग्रजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये संस्थापक अध्यक्ष मेस्टा
डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी सांगीतले.यावेळी सचिन मलिक( प्रसिद्धी प्रमुख मेस्टा,)अॅड.एस बी महाले, अॅड.सुनील पालवे, सुनील लोटके,(अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा), विजय शिंदे,(कार्याध्यक्ष, अहमदनगर शहर व तालुका)यश शर्मा, (सचिव, अहमदनगर शहर),जयश्री मेहेत्रे,आदर्श धोरजकर,(अहमदनगर तालुका),देविदास गोडसे, अंतरप्रित धुप्पड आदि उपस्थित होते.अधिक माहिती साठी या नंबर वर संपर्क करावे.9850234333
Post a Comment