प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

अहमदनगर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य  संमेलनाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शेवंगाव येथील प्रा. डॉ.शंकर चव्हाण यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असुन २७ मार्च रोजी नागपूर येथे तो प्रदान करण्यात येणार आहे. प्रा.डॉ.शंकर चव्हाण हे पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातुन उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले असुन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.
त्यांचे 'प्रिये', 'मशाल', 'कोंडमारा', 'दमन', 'जिने चंदनाचे', 'कामगार चळवळ एक विश्लेषण' अशी पुस्तकं प्रकाशित झाली असुन विद्यापीठस्तरावर  संदर्भ ग्रंथ म्हणुन त्यांची काही पुस्तकं आहेत,विविध सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक चळवळीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान असुन त्यांना यापूर्वी २७ पुरस्कार व पारितोषिक मिळालेली आहेत.अहमदनगर व पुणे आकाशवाणी वर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत.त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल आमदार लहू कानडे,पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभयराव आव्हाड,उपाध्यक्ष ऍड सुरेशराव आव्हाड, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी,भगवान राऊत,प्राचार्य शिवाजीराव देवढे,प्राचार्य जी.बी.ढाकणे, बाप्पूसाहेब भोसले,माजी जि. प.सदस्य पवनकुमार साळवे,प्रा.जयंत गायकवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा