जागतिक डेंग्यू दिनानिमित्त डॉ.पी.डी गांडाळ यांचा 'डेंग्यू वाॅरीयर्स' पुरस्काराने सन्मान !

◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (राजेश सटाणकर) २१.६.२०२३
    राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण व प्रतिबंध कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जागतिक डेंग्यू दिनाचे औचित्य साधून डॉ.पी.डी गांडाळ, सहाय्यक संचालक यांना नुकताच 'डेंग्यू वाॅरीयर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने अहमदनगर येथे डॉ.गांडाळ यांचा हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    राज्याचे पर्यटन व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रसाद लोढा, माजी आरोग्य महासंचालक तथा राज्य साथरोग सल्लागार डॉ.सुभाष साळुंके, अमेरिकन शास्त्रज्ञ स्कॉट टिकनर व हेराल्ड ब्रेमॅन यांचे उपस्थितीत बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथील अमेरिकन दूतावासात इको-बायो ट्रॅप व consulate जनरल ऑफ अमेरिकन सर्व्हिसेस यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ गांडाळ यांना 'डेंग्यू वॉरीयर्स' म्हणून गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.           डॉ.गांडाळ यांनी अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालय येथे आरोग्य पर्यवेक्षक यांच्या बैठकीत उपस्थित राहून हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व पूर्वतयारी, उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. त्यादरम्यान 'डेंग्यू वॉरीयर्स' पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. गांडाळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   याप्रसंगी हिवताप संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, अरुण लांडे, भागवत, संदीप भिंगारदिवे, सोनार, राम रासकर, वैराळ तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, नाशिक विभागीय कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ सहाणे, प्र.सहा. जि. हिवताप अधिकारी सावंत तसेच भामरे, गांगर्डे, जिल्ह्यातील तालुका आरोग्य पर्यवेक्षक तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा