योग: कर्मसु कौशलम्‌ !

◽ मख़दुम समाचार ◽
२१.६.२०२३

योग: कर्मसु कौशलम्‌ !
     आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात.

आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसेच योग हे जीवनाचे लक्ष्य साध्य करण्याचे शास्त्र आहे असे म्हणता येईल. म्हणून ही दोन्ही शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्य मिळाले, योगातील अष्टांगाच्या मदतीने पर्यावरण, समाज, नातेसंबंध, मन, इंद्रिये यांच्या आरोग्याची जोड मिळाली, तर जीवन यथार्थाने जगणे, जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे शक्य होते. शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक स्थिरता इतकेच नाही, तर निसर्गातील समतोल कायम राहावा, सुधारावा यासाठी ‘योग’ व ‘आयुर्वेद’ यांच्याशिवाय पर्याय नाही. 

भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद आणि योगाभ्यास यांना प्रचंड महत्त्व आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टी गरजेच्या असून त्या परस्पर पूरकदेखील आहेत. आयुर्वेदात ज्याप्रमाणे आयुर्वेदिक वनस्पतींना महत्त्व आहे. तितकंच महत्त्व योगासनांनादेखील आहे. मुळात आयुर्वेद प्रवेश हा पदर्शनाच्या अभ्यासाने होत असतो. या सहा दर्शन शास्त्रातील एक शास्त्र म्हणजे योगदर्शन. म्हणजेच आयुर्वेद शिकण्यासाठी योगदर्शनाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाचे तत्वज्ञान नीट समजून घ्यायचे असेल तर प्रथम योगादि तत्वज्ञान माहित असणे आवश्यक होते.  
 १. दिनचर्या आणि योगाभ्यास -
शारीरिक व्याधी दूर करायच्या असतील तर पहाटे लवकर उठणे आणि योगाभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच ब्राह्म मुहूर्तावर म्हणजेच सूर्योद्यापूर्वी सुमारे तीन तास आधी उठणे व नित्य शौच झाल्यावर व्यायाम करणे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा तुमच्यात निर्माण होते.

 २. स्वस्थवृत्त आणि योगाभ्यास -
आयुर्वेदातील स्वस्थवृत्त म्हणजे सदा आरोग्य टिकविण्यासाठीचे मार्गदर्शन याविषयात योगाभ्यासाचा समावेश होतो. आरोग्य टिकविण्यासाठी आहाराबरोबरच विहारामध्ये व मानस मार्गदर्शनामध्ये योगाभ्यास आवश्यक आहे हे आयुर्वेद सांगतो.
 ३. सद्वृत्त आणि योगाभ्यास-
सदाचरण आणि मनाची प्रसन्नता टिकविण्यासाठी योगाभ्यास अत्यंत गरजेचा आहे. 
आयुर्वेदामध्येही मनाच्या प्रवृत्तीचे नियंत्रण करणारा (चित्त वृत्ती निरोधरुपी ) योगमार्गदर्शन अतिशय महत्वाचा आहे.
४. रोगनिदान आणि योगाभ्यास -
कोणत्याही आजाराचं मूळ कारण व्यसन असल्याचं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीला एका ठराविक गोष्टीचं व्यसन असतं. काहींना धुम्रपान करण्याचं, काहींना अमूक ठराविक पदार्थ खाण्याचं किंवा सतत वाचन करण्याचं व्यसन असतं. मात्र, या व्यसनांचा अतिरेक झाला की ते मनुष्यासाठी त्रासदायक ठरतं. त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या व्यसनावर मात करायची असेल तर मन स्थिर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मनावर हे नियंत्रण योगच्या माध्यमातून मिळवता येतं.
 ५. चिकित्सा आणि योगाभ्यास -
आयुर्वेदामध्ये योगशास्त्रनियमांचा उपयोग चिकित्सा म्हणून मानसविकारांमध्ये तर केलाच आहे. पण, इतरही अनेक विकारांमध्ये योगाभ्यास उपयोगी पडतो. मानस विकार किंवा मनाच्या प्रमुख योगदानामुळे होणाऱ्या विकारात उपचारांमध्ये सांगितलेले उपाय हे प्रत्याहार, ध्यान, धारणा या योगिक स्वरूपातील आहेत. अनेक शारीरिक विकारांमध्ये सांगितलेले उपाय हे पुन्हा नियम, आसन आणि प्राणायामाशी संबंधित आहेत असे लक्षात येते.
आयुर्वेदातील योगशास्त्राचे महत्त्व
 १. आसन आणि प्राणायाम -
आसन आणि प्राणायाम ही मुख्यत्वे शारीरिक प्रक्रिया आहे. त्यामध्ये शरीराची लवचिकता, स्नायूपेशींची सक्षमता, सांध्याच्या सुरळीतपणा आदी गोष्टी आवश्यक असतात. 
२. समाधी-मोक्ष आणि आयुर्वेद -
आयुर्वेदाच्या प्रारंभिक चार उद्दिष्टांमध्ये मोक्ष अंतर्भूत असल्याने आयुर्वेदाचे सारे मार्गदर्शन हे मोक्षप्राप्ती साठीच आहे. आणि, मोक्षप्राप्ती साठी प्रथम शरीरचिंतांचे निरसन (आरोग्य) आणि मनाचे नियंत्रण करणारे अनेक मार्ग आयुर्वेदामध्ये वर्णिले आहेत. त्या सर्वांचा उपयोग करून खरेतर सुख आणि दुःख हे ज्याला सामान आहेत असा योगी होण्याची प्रक्रिया पूर्ण होते आणि मोक्षकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. 
म्हणून चरकाचार्य आयुर्वेदातील एक महत्वाचे संहिताकार "योगः मोक्षप्रवर्तकाः" असे म्हणतात. असा हा आयुर्वेद आणि योगशास्त्रचा परस्पर पूरक आणि उपयोगी संबंध आहे.

 संकलक -  डॉ. प्रसाद ह. उबाळे पा.
आयुर्वेदाचार्य, 
मनःस्वास्थ्य आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, 
शहर बँकेसमोर, भिडे चौक, सावेडी नाका, 
अहमदनगर, 
9822107037

आपले आरोग्य आणि आयुर्वेद यांच्या माहिती साठी आमचा मनःस्वास्थ्य आयुर्वेद हा  व्हॉटस्अप ग्रुप नक्की जॉइन करा.

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा