▫️मख़दुम समाचार▫️
मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) २१.६.२०२३
कुलाबा येथील रेडिओ क्लबमधे महाराष्ट्रातील प्रागतिक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमधे येत्याकाळात करण्यात येणारे कृती कार्यक्रम ठरविण्यात आले. दि. ८,९ जुलै रोजी पुण्यात प्रागतिक पक्षांचे राज्यव्यापी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून घटक पक्षांचे किमान ५०० लोक सहभाग घेणार आहेत. शिबिरात महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व चर्चा होणार असून आपापल्या पक्षाच्या वतीने ५० जणांची भागिदारी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आहे. ऑगस्ट महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यात जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विभागीय व जिल्हा पातळीवर संयुक्त सभा मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
बैठकीमधे लोकसभा, विधानसभा मतदारसंघ निश्चितीसाठी व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आठ जणांची कमिटी तयार करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. मिलिंद रानडे, शेकाप नेते भाई जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, भाई राजू कोरडे, मार्क्सवादी पक्षाचे नेते कॉ. एस. के. रेगे, कॉ. शैलेंद्र कांबळे, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी, मिराज सिद्दीकी, बहुजन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ॲड. सुरेश माने, जनता दल सेक्युलरचे प्रताप होगाडे, राज्याध्यक्ष नाथा शेवाळे, लाल निशाणचे विजय कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.
إرسال تعليق