जळगाव. येथील खान्देश उर्दू कान्सिल च्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने शहरातील मेहरुन परिसरात उर्दू भाषिक महिला नवोदित साहित्यिकां चे सत्कार करून अनोख्या पद्धतीने ने दिन साजरा करण्यात आला. यात राजकन्या मेहरून्नीसा यांच्या नावाने परिसर संबोधित आहेत, तसेच शहरातील २०व्या शतकातील 8व्या दशका ची उर्दू भाषीक महिला साहित्यिका स्व.बी. सकीना नाज़ व सध्या मुंब्रा ठाणे स्थित जळगाव नगरी ची सुकन्या नौशाद बेगम सैय्यदा हृयांच्या आठवणी करून त्यांच्या साहित्य सेवे वर चर्चा हि झाली. या वेळी आपल्या लेखनी द्वारे जळगाव नगरी चे नाव जग भर प्रकाश झोतात आनणार्या महिला नवोदित उर्दू साहित्यिका ज़ैनब पटेल व मुस्कान हारून पिंजारी ह्यांचे सत्कार करुन त्यांना गौरविण्यात आले सध्या जैनब पटेल विविध वृत्तपत्रान द्वारे तर मुस्कान हारून पिंजारी ह्या ज़बरदस्त कहानिया युट्यूब द्वारे प्रबोधनात्मक व सकारात्मक धोरण समोर ठेवून लेखन कार्य करतांना दिसत आहे.ह्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सलीम इनामदार,(एन.सी.पी) मुकतदीर देशमुख (कांग्रेस) सईद पटेल संस्था सचिव, अकिल खान ब्यावली संस्था अध्यक्ष यांनी हि उर्दू भाषा साहित्य, तसेच जळगाव जिल्ह्यात उर्दू भाषा ची स्थिती व जिल्ह्यात "उर्दू घर"ची गरज व स्थापने साठी प्रयत्न इत्यादी विषयांवर चर्चा केली प्रा.मुशताक भिस्ती,हारुन दादा उपस्थित होते.सुत्रसंचलन नौशाद हमीद यांनी केले सफलते साठी साकीब पटेल,आसीम खान यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق