ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली,त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली, मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला

शेवगाव – “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली,त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली, मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला.” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.  शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला काटे होत्या,विचारपीठावर माजी पोलीस सहाय्यक आयुक्त बाबासाहेब बुधवंत,अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय फडके,बापूसाहेब भोसले,प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे, प्रा.गणगे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राचार्य शितोळे म्हणले की, “एका रूम मधुन सुरु केलेल्या कॉलेज चा आज वटवृक्ष झाल्याचे पाहून आनंद वाटला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतांना अनेकांचं सहकार्य लाभले”, तर प्राचार्य देवढे म्हणले की, “वर्षातून एकदा तरी महाविद्यालयात येऊन शक्य असेल ते दिलं पाहिजे, अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान असुन त्यांनी नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे”.श्रीमती निर्मला काटे, बाबासाहेब बुधवंत यांनीही मनोगत व्यक्त केले.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद देशमुख यांनी केले,अध्यक्ष संजय फडके यांनी स्वागत करून परिचय करून दिला.मनेष बाहेती यांनी अहवाल वाचन केले.शेवटी प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे यांनी आभार मानले.यावेळी माजी विद्यार्थीनी कवियत्री शर्मिला गोसावी, ॲड्.अनिल सरोदे,केदारेश्वर चे उपाध्यक्ष महादेव काटे,क्रीडाधिकारी अनिल वीर यांचा तसेच सर्व माजी प्राध्यापकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषद चे संस्थापक सुनील गोसावी, कुकाणा ग्रा. प. सदस्य बाळासाहेब गर्जे, कॉ.संजय नांगरे, एमएसईबी चे अधिकारी सुरेश जायभाय, कांचन उद्योग चे सुभाष जाधव,बाप्पुसाहेब गवळी, बाप्पुसाहेब मगरे,बाळासाहेब डाके,ओमप्रकाश जाजू,अशोक उगलमुगले,राजेंद्र पोटफोडे,हरिभाऊ नजन,बाळासाहेब फलके,प्रा.सुनील काकडे,प्रा.काकासाहेब लांडे,मिलुंद काटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश दहिफळे, गोरक्षनाथ काळे डॉ.युवराज सुडके,चंद्रकांत कर्डक, डॉ.रवींद्र जैन, डॉ.रवींद्र वैद्य, मनीष बाहेती, अरविंद देशमुख यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा