स्वातंत्र्य चळवळीत कम्युनिस्टांचे योगदान मोठे - कॉ. पांडूरंग शिंदे

अहमदनगर - *भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कम्युनिस्टांचे योगदान मोठे असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,देशाला दिशा देण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेत्यांनी केले आहे* असे प्रतिपादन जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ.पांडुरंग शिंदे यांनी व्यक्त केले.
       बुरुडगाव रोड वरील किसान भवन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने प्रगतिशील लेखक संघ,ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन,ऑल इंडिया युथ फेडरेशन,इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा), आयटक, क्रांतिसिंह कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
        यावेळी विचारपिठावर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडूळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.एड. सुभाष लांडे पाटील, भारतीय महिला फेडरेशन च्या राज्य अध्यक्ष कॉ स्मिता पानसरे, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ॲड बन्सी सातपुते, प्रगतिशीलचे कॉ. रामदास वाघस्कर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी कॉ. भैरवनाथ वाकळे, ॲड.रमेश नागवडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कॉ. शिंदे म्हणाले की, रजाकाराच्या विरोधात लढण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी योगदान दिलेले असून त्यांचीही या निमित्ताने आठवण केली पाहिजे, सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी शाहीर अण्णाभाऊ साठे, कॉ. अमर शेख यांच्या कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
       यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कम्युनिस्टांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर बोलताना डॉ. गणेश विधाते म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा पूर्वी लालगड म्हणून ओळखला जात होता, वंचित कष्टकरी,बिडी कामगार यांनी एकत्र लढा देऊन स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे, शेतकरी,कामगार व खंडकरी चळवळीतील सर्वसामान्य माणसांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेला आहे. जनतेमध्ये जाऊन चळवळ करण्यामध्ये कम्युनिस्ट आघाडीवर असल्याने हा जिल्हा  लाल जिल्हा म्हणून ओळखला जात होता ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी आजही पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील विविध ठिकाणच्या चळवळीच्या आठवणी जागृत केल्या.
      कॉ. सुभाष लांडे पाटील यांनी विविध जनसंघटनांच्या माध्यमातून चळवळी जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केला जातो, ही अत्यंत चांगली गोष्ट असून लिहिणाऱ्यांना एकत्र करून काव्य संमेलनाचे आयोजन करून स्वातंत्र्यसंग्रामातील योद्धांना सलामी देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असा आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य सहसचिव शर्मिला गोसावी यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष कॉ. रामदास वाघस्कर यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या काही रचना सादर केल्या. कॉ. भैरवनाथ वाकळे, ज्ञानदेव पांडुळे, एड.बंशी सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. कुमकुम मार्च या शॉर्ट फिल्म ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रणित मेढे यांचा प्रा. कॉ. स्मिता पानसरे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानदेव पांडूळे, शर्मिला गोसावी, बाळासाहेब मुंतोर्डे,राहुरी , सुनील महाजन, रामदास वागस्कर, रामदास घुटे यांनी पुरोगामी विचारांशी सुसंगत काव्य रचना सादर केल्या.
कार्यक्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,प्रा एल बी जाधव, दीपक शिरसाट,आनंद घोलवड,विकास गोसावी,रामदास गोटे, तुषार सोनवणे, अरुण थिटे, रमेश नागवडे, शेख अब्दुल गणी, अर्पिता गोलवड यांच्यासह साहित्यिक, साहित्य रसिक, कलावंत ,प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.
यावेळी सर्वांचा पुस्तकं भेट देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा