"तिसरे कन्या रत्न अपत्य" असणारयाला रु. १ लाख मुदत ठेव भेट

सन १९८३ ५ मे रोजी स्थापित मा.आ.कि.बा.उर्फ काकासाहेब म्हस्के स्मृती प्रतिष्ठान वेगवेगळे आरोग्यविषयक व सामाजिक तसेच शैक्षणिक प्रकल्प अखंडपणे ग्रामीण व बहुजन समाजातील मुला-मुलींना स्वयंरोजगार निर्मितीचे कै.काकासाहेब म्हस्के बी.एच.एम.एस., एम.डी., होमिओपॅथीक व कै. पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूट तसेच काकासाहेब म्हस्के डी.फार्मसी नागापूर येथे चालवीत असून त्यामध्ये ७५ टक्के मुलींना स्वावलंबी बनविण्याचे धोरण राबविण्यात संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ.सुभाष म्हस्के यांच्या सुविद्ध पत्नी डॉ.सौ.सुमती म्हस्के या खंबीरपणे साथ देत आहेत. उभयतांची मुले डॉ.सौ. दिप्ती, व डॉ.सौ शलाका (ब्रीजलेंड)एम.आर.सी.जी.पी.व चि.डॉ.अभितेज सुभाष म्हस्के,एम.एस.(आर्थों) एम.आर.सी.एस.एफ.आर.सी.एस.फेलो ऑफ युरोपियन
बोर्ड ऑफ ट्रॉमॅटोलॉजी तर सून डॉ. सौ. केतकी अभितेज म्हस्के यांना एम.डी. गायनॅकोलॉजी डी.आर.सी.ओ.जी. (ऑक्सफोर्ड) घडविण्यात मोठा हातभार लावीत असून
अथकपणे सचोटीने मुलांना संस्कारक्षम उच्च शिक्षित करण्यास त्यांच्या वयाला २२जानेवारी २०२३ रोजी ७५ वर्ष होत आहेत. त्याप्रीत्यर्थ "तिसरे कन्या रत्न अपत्य" यानावाने रु. १ लाख मुदत ठेव अंबिका महिला सहकारी बँक या महिला बँकेत त्या मुलीच्या लग्नाच्या ठेवी म्हणजे अंदाजे १८ वर्षानंतर मुदतठेव ठेवण्यासाठी देण्यात येणार आहे.
२०२२ पासून जन्मलेल्या तिसऱ्या कन्यारत्नाच्या पालकांसाठी हि योजना असून या पुढील काळात आमची पुढची पिढी कार्यान्वयीत ठेवील अशी आशा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा